आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उदघाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये रिंगिंग बेल वाजवून मोदी यांनी आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उद््घाटन केले. - Divya Marathi
गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये रिंगिंग बेल वाजवून मोदी यांनी आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उद््घाटन केले.
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उदघाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. “इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज’ नावाने गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये रिंगिंग बेल वाजवून मोदी यांनी या बाजाराचे उदघाटन  केले. 

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणुकीची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजार २१ व्या शतकात मैलाचा दगड ठरणार असल्याचे मोदी म्हणाले.  आयटी तसेच आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या देशात जागतिक पातळीवरील सुविधा देतील, असा विश्वास मोदी यांनी या वेळी व्यक्त केला. भारत आयटी तसेच आर्थिक सेवा देण्याच्या बाबत सर्वात पुढे असल्याचेही मोदी या वेळी म्हणाले.

कौशल्य तसेच तंत्रज्ञान यांचा संयोग भारतीय कंपन्या तसेच आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थांना प्रतिस्पर्धेसाठी अधिक सक्षम बनवण्यास मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. हा आंतरराष्ट्रीय शेअर बाजार दोन टप्प्यांमध्ये काम करणार असून पहिल्या टप्प्यामध्ये जागतिक बाजारात २२ तास काम करेल.