Home | Business | Share Market | five companies IPO of 3,800 crore in March

मार्चमध्ये पाच कंपन्यांचे 3,800 कोटींचे आयपीओ

वृत्तसंस्था | Update - Feb 28, 2017, 03:00 AM IST

शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी मार्च महिन्यात पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. ३,८०० कोटी रुपये जमवण्याचा कंपन्यांचा मुख्य उद्देश असणार आहे.

 • five companies IPO of 3,800 crore in March
  नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी मार्च महिन्यात पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. ३,८०० कोटी रुपये जमवण्याचा कंपन्यांचा मुख्य उद्देश असणार आहे. डीमार्ट रिटेल चेन चालवणारी अॅव्हॅन्यू सुपरमार्टस कंपनीचा १,८७० कोटींचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पीएबी हाऊसिंग फायनान्सच्या ३,००० कोटींच्या आयपीओनंतर हा आयपीओ सर्वात मोठा असेल.

  यावर्षी आतापर्यंत सध्या बीएईचा एकच आयपीओ आला आहे. या आयपीओने बाजारातून जवळपास १,२५० कोटी रुपये जमवले. याची लिस्टींग एनएसईवर झाली. आता बीएसईकडून सूचीबद्ध असलेला ५०० कोटींचा सीडीएसएल देखील दाखल होईल. प्रस्तावानुसार ३१ मार्चपर्यंत तो सूचीबद्ध होईल. याच्या प्रस्तावित ३.५ कोटी शेअर्समधून ७ लाख शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. वेलस्पन एंटरप्रायजेसनेही ३ मार्चला बायबॅक ऑफर आणली आहे. २७० कोटींची ही ऑफर १७ मार्चला संपणार आहे.

  ओएनजीसी एचपीसीएल विकत घेण्याची शक्यता
  देशात एकच मोठी ऑइल कंपनी निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकार पावले टाकत असून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशनकडून (ओएनजीसी) हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेडची (एचपीसीएल) खरेदी होऊ शकते. ४४ हजार कोटींमध्ये (६.६ अब्ज डॉलर) हा व्यवहार होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  एचपीसीएलमध्ये सरकारची ५१.११ टक्के भागीदारी आहे. सध्याच्या शेअर्सचा भाव पाहता ओएनजीसीला सरकारला २९,१२८ कोटी रुपये द्यावे लागतील. यानंतर एचपीसीएलच्या इतर समभागधारकांकडून अतिरिक्त २६ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी खुली ऑफर आणावी लागेल. यासाठी १४,८१७ कोटी रुपये लागतील. म्हणजेच एकूण ४३,९४५ कोटी रुपये द्यावे लागतील. एमआरपीएल या उपकंपनीच्या माध्यमातून ओएनजीसी अगोदरच रिफायनरी व्यवसायात आहे. एचपीसीएलच्या अधिग्रहणानंतर याची रिफायनिंग क्षमता वार्षिक २.३८ कोटी टनने वाढेल.

  २६ कंपन्यांनी जमवले २६,००० कोटी
  आयपीओचा विचार करता मागील वर्षीचा काळ उत्तम राहिला. सहा वर्षांमध्ये मागील वर्षी चांगली स्थिती होती. मागील वर्षी २६ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून जवळपास २६,००० कोटी रुपये जमवले. २०१० च्या नंतर ही मोठी रक्कम आहे.

  रिलायन्सचे बाजार भांडवल ४ लाख कोटींहून अधिक
  रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सोमवारी वाढ नोंदवण्यात आली. याचा मार्केट कॅप ४,०१,७८४.६३ रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्सव्यतिरिक्त आता फक्त टीसीएसचा मार्केट कॅप चार लाख कोटींहून अधिक म्हणजेच ४,९०,४१९.८१ कोटी रुपये आहे. बीएसईमध्ये रिलायन्सचा शेअर ४.७४% वाढून १२३८.६० रुपयांवर पोहोचला आहे. नऊ वर्षांत हे सर्वाधिक आहे. दिवसभराच्या व्यवसायात यात ६.२४% वाढ झाली आणि तो १,२५६.५० वर पोहोचला. सोमवारच्या याच्या मार्केट कॅपमध्ये १८,१९७.६३ कोटींची वाढ झाली. मागील बुधवारी जिओ प्लॅनच्या घोषणेनंतर रिलायन्सचे शेअर ११% वाढले होते.

  या कंपन्यांचे आयपीओ येणार
  कंपनी आईपीओ साइज
  अॅव्हॅन्यू सुपरमार्टस १,८७०
  शंकर बिल्डिंग प्रोडक्ट ६००
  सीएल एजुकेट ५००
  सीएल एजुकेट ४००
  म्यूजिक ब्रॉडकास्ट ४००

Trending