Home | Business | Share Market | fives ways how income tax dept search out your income

सावधानः या 5 प्रकारे तुमचे उत्पन्न माहिती करुन घेतले जाते, अशी होते IT ची कारवाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 24, 2017, 02:34 PM IST

नवी दिल्ली- तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या वर आहे तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.

 • fives ways how income tax dept search out your income

  नवी दिल्ली- तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या वर आहे तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इन्कम टॅॅक्स रिटर्न भरला नाही तर सरकारला समजणार नाही की तुमचे उत्पन्न किती आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

  वार्षिक उत्त्पन्न २.५ लाखांच्या वर आहे अशा लोकांचे इन्कम टॅॅक्स प्रोफाईल सरकार चेक करत राहते. त्यांनी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर एजन्सी लगेच अॅक्टीव्ह होतात.

  केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांत १.२५ करोड नवीन लोकांना टॅक्स नेटमध्ये आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. आज आम्ही तुम्हाला ५ पद्धतींची माहिती देणार आहोत, की सरकार कशी तुमच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवते. अशा वेळी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येण्याचीही शक्यता असते.

  तुम्ही कार खरेदी केली
  इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलचे माजी सदस्य आणि सीए राकेश गुप्ता यांनी सांगितले, की तुम्ही कार खरेदी केली तर त्याची नोंद सरकार दरबारी ठेवली जाते. नवीन नियमांप्रमाणे कार खरेदी केली तर तेव्हा पॅन कार्ड डिटेल्स देणे आवश्यक आहे. अशा वेळी तुमच्या पॅन डिटेल्सवरुन सरकार माहिती करुन घेते, की तुम्ही रिटर्न भरला आहे की नाही. तुम्ही जर रिटर्न फाईल केला नसेल तर इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला नोटीस पाठवून आणखी माहिती घेऊ शकते. तसेच तुमच्याकडे पैसे कोठून आले याचीही माहिती विचारली जाऊ शकते.

  ३० लाखांच्या वरची प्रॉपर्टी खरेदी केली तर
  तुम्ही ३० लाखांच्या वरचा फ्लॅट किंवा प्लॉट विकत घेतला आणि त्याची रजिस्ट्री केली तर लगेच इन्कम टॅॅक्स विभागातील कर्मचारी तुमची टॅक्स प्रोफाईल चेक करतात. यावेळी तुम्हाला पॅन डिटेल्स द्यावे लागतात. त्याच्या माध्यमातून हे डिटेल्स काढले जातात. अशा वेळी त्यांना काही संशयास्पद व्यवहार वाटला तर नोटीस पाठवून स्पष्टीकरण विचारले जाऊ शकते.

  पुढील स्लाईडवर वाचा, तुमचे इन्कम जाणून घेण्याच्या या आहेत आणखी दोन पद्धती....

 • fives ways how income tax dept search out your income

  महागडे लाईफस्टाईल
  तुमची लाईफस्टाईल जर खर्चिक असेल तरीही तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत येऊ शकता. तुम्ही लाखोंचे बिल डेबिट किंवा क्रेडिट कार्टने भरले, विदेश प्रवास केला, मोठी खरेदी केली तर लगेच विभाग तुमचे प्रोफाईल चेक करतो. त्यानुसार तुमचे रिटर्न तपासले जाते. अशा वेळी नोटीस येण्याची शक्यता वाढते.

 • fives ways how income tax dept search out your income

  अकाऊंटवरुन मोठे कॅश ट्रान्झॅक्शन
  तुमच्या अकाऊंटवरुन  ५ लाखांपेक्षा जास्त रकमेचे ट्रान्झॅक्शन होत असेल तर इन्कम टॅक्स विभागा त्याची माहिती घेतो. तुमची टॅक्स प्रोफाईल चेक केली जाते. पैसा कोठून आला, कोठे गेला याची माहिती घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता असते. तुम्ही डिटेल्स देण्यात अपयशी ठरले तर तुमच्यावर कायद्याने कारवाई केली जाते.

 • fives ways how income tax dept search out your income

  फिल्ड सर्व्हे
  इन्कम टॅक्स विभागाचे भारतभर अनेक ऑफिसेस आहेत. त्यांच्या माध्यमातून फिल्ड सर्व्हे केले जातात. अशा वेळी इन्कम टॅक्सचे भरारी पथक ठिकठिकाणी जाऊन माहिती गोळा करते. तुमच्याकडे असलेली संपत्ती चेक करते. त्यातून डिफॉल्टर्सची माहिती मिळते. 

Trending