आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात येणार चार आयपीओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - या महिन्यात चार कंपन्या आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये दिलीप बिल्डकॉन, नवकार कॉर्प, प्रभात डेअरी आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे. यांची आयपीओच्या माध्यमातून निधी बाजारातून जवळपास १,८२० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे.

पॉवर मेकचा आयपीओ ७ ऑगस्टला उघडणार असून ११ ऑगस्टला बंद होणार आहे. उर्वरित तीन कंपन्यांचे आयपीओ त्यानंतर येतील.
यांचे शेअर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील यादीत येतील. आयपीओच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशाचा वापर कंपन्यांची विस्तार योजना, कर्जाची परतफेड, वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जाईल. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी दिलीप बिल्डकॉन आयपीओच्या अंतर्गत ६५० कोटी रुपयांचे इक्विटी शेअर जाहीर करणार आहे. तर यातील सध्याच्या शेअरधारकांकडील १.४९ कोटींचे शेअर "ऑफर फॉर सेल' (ओएफएस) अंतर्गत विकण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील कंपनी नवकार कॉर्प नव्या इक्विटी शेअरच्या माध्यमातून ५१० कोटी रुपये जमा करणार आहे, तर ९० कोटी रुपये सध्याचे शेअर विकून जमा करणार आहे. दुधाचे पदार्थ बनवणाऱ्या प्रभात डेअरीने आयपीओच्या माध्यमातून ३०० कोटी रुपये जमा करण्याची योजना बनवली आहे. ते नव्या इक्विटी शेअरव्यतिरिक्त १.४७ कोटी शेअर ओएफएसच्या माध्यमातून विकणार आहेत. तर पॉवर मेकची आयपीओच्या माध्यमातून जवळपास २७० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे.
आयपीओ बाजारात तेजी
२०१४ च्या मंदीनंतर आयपीओ बाजारात चांगली हालचाल आहे. या वर्षी आतापर्यंत नऊ आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत. इतर काही आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये इंडिगो, कॅफे कॉफी डे आणि मॅट्रिक्सचा समावेश आहे. आतापर्यंत आलेल्या ९ आयपीओच्या कंपन्यांनी बाजारातून ४,५५० कोटी रुपये जमा केले आहेत.