आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैफेर विक्रीच्या मा-यात सलग चाैथ्यांदा अापटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंपन्यांची तिमाहीतील संमिश्र कामगिरी, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात हाेण्याच्या मावळलेल्या अपेक्षा याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. चाैफेर विक्रीच्या मा-यात वाहन अाणि स्थावर मालमत्ता कंपन्यांच्या समभागांना माेठा फटका बसून सेन्सेक्स सलग चाैथ्यांदा १०२.१५ अंकांनी घसरला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडला हाेता. येत्या चार अाॅगस्टला रिझर्व्ह बँकेची नाणेनिधी धाेरण अाढावा बैठक हाेत अाहे. व्याजदर कपातीकडे बाजाराचे डाेळे लागलेले अाहेत. परंतु डीबीएस जागतिक वित्तीय कंपनी तसेच माॅर्गन स्टॅन्ले व अन्य काही ब्राेकरेज हाऊसेसनी या वेळेला व्याजदर कमी हाेण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला अाहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दुपारच्या सत्रात सावध भूमिका घेत विक्रीचा मारा केला. त्यामुळे सकाळच्या सत्रात झालेला नफा धुतला गेला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीला मंगळवारपासून सुरुवात झाली अाहे. या बैठकीत काय हाेते याकडे जगभरातील बाजारांचे लक्ष लागले अाहे. त्यामुळे त्याचाही परिणाम बाजारावर झाल्याचे मत हेम सिक्युरिटीजचे संचालक गाैरव जैन यांनी व्यक्त केले. बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात मिड कॅप अाणि स्माॅल कॅप समभागांनाही फटका बसला. विदेशी गुंतवणूकदारांनी साेमवारी ८५९.९४ काेटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याचे अाकडेवारी सांगते. स्थावर मालमत्ता, अाराेग्य, धातू, वाहन, तेल-वायू अाणि तंत्रज्ञान या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण झाली. अाशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण हाेते, तर युराेप बाजारात कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे तेजीची धारणा हाेती.

टाॅप लुझर्स : डाॅ. रेड्डीज लॅब, हीराे माेटाेकाॅर्प, एचडीएफसी, अायसीअायसीअाय बँक, टाटा माेटर्स, बजाज अाॅटाे, भारती एअरटेल, सिप्ला, टाटा स्टील, विप्राे, काेल इंडिया, गेल, महिंद्रा अँड महिंद्रा, अाेएनजीसी, लुपिन.

निफ्टी २४अंकांनी घसरला
राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक दिवसभरात ८३९७.४० अंकांच्या कमाल पातळीवर गेला हाेता. परंतु नंतर कमाल पातळीवर झालेल्या विक्रीच्या मा-यात निफ्टी २४ अंकांनी घसरून ८३३७.०० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

चौफर विक्रीचा मारा
सेन्सेक्स सकाळच्या सत्रात चांगल्या पातळीवर उघडला हाेता, पण दुपारच्या सत्रात विक्रीचा जाेर वाढल्यामुळे अगाेदरची सगळी कमाई धुतली गेली. चाैफेर विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सने २७,४१६.३९ अंकांची नीचांकी पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स १०२.१५ अंकांनी घसरून २७,४५९.२३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. काही बड्या कंपन्यांनी जूनअखेर तिमाहीत केलेली निराशाजनक अार्थिक कामगिरी, चीनच्या बाजारातील पडझड अाणि पार्टिसिपेटरी नाेट्ससाठी केंद्र सरकार कडक नियमावली अाणण्याचे दिलेले संकेत या काही प्रमुख घडामाेडी कारणीभूत ठरून सेन्सेक्स गेल्या चार सत्रांत १०४५.७० अंकांनी घसरला.