आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या सहामाहीत सोने मागणीत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेत सातत्याने संकट येत असून जगात सोन्या-चांदीची मागणी वाढता राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे भारतात सणांचा हंगाम सुरू झाला आहे व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याने या वर्षी दुसऱ्या सहामाहीदरम्यान सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. दागिने निर्मिती उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, २०१६च्या पहिल्या सहामाहीत मागणी कमी राहिली असली तरी दुसऱ्या सहामाहीत चांगली मागणी असेल.

पहिल्या सहामाहीत सोन्याची तस्करीद्वारे आवक झाली तसेच किमतीही वाढलेल्या होत्या. शिवाय दागिन्यांवर अबकारी कर लावण्यात आला व सराफा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने मागणी घटताना दिसून आली; परंतु ऑक्टोबरदरम्यान मागणी वाढणार असल्याची आशा आहे.
बातम्या आणखी आहेत...