नवी दिल्ली - सोन्याच्या किंमती गेल्या 15 दिवसांपासून वाढलेल्या आहेत. परंतु किंमतीमध्ये पुन्हा घट होण्याचे अंदाज अमेरिकेच्या सिटीग्रुप बँकेने वर्तवले आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीमध्ये 40 डॉलरने घट होऊन सरासरी 1140 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारावर देखील होणार आहे. पुढील 15 दिवसानंतर साेने 25000 रूपयांवर येण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सिटीग्रुप बँकेने 2015 - 2016 वर्षांसाठी सोन्याच्या किंमतीमध्ये घट केली आहे. बाजाराला केवळ आता फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची प्रतिक्षा आहे. स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा 1000 रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ज्यात गेल्या 15 दिवसांमध्ये 1330 रूपयांनी वाढ झाली होती.
पुढील स्लाइडवर पाहा सोन्याच्या किमती विषयी माहिती...