आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने घेण्याची ही योग्य वेळ, किमती 4.5 महिन्यात सर्वात खालच्या स्तरावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही सोने विकत घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही सर्वात योग्य वेळ आहे. गेल्या तीन महिन्यात वायदे बाजारात सोन्याच्या किमती १७८१ रुपये प्रति १० ग्रॅम खाली आल्या आहेत. गेल्या साडेचार महिन्यात सोन्याच्या किमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. बुलियन मार्केटमध्येही सोने गेल्या ३ महिन्यात १६०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले आहे. बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत २९,५०० रुपयांच्या लेव्हलवर आली आहे. डॉलरच्या व्हॅल्यूतही सोन्याच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यात १०० डॉलर प्रति १० ग्राम घट दिसून आली आहे.

 

अशा आहेत घडामोडी
- ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किमती १२५० डॉलर प्रति १० ग्राम खाली आल्या आहेत. ८ डिसेंबरला सोने १३५१ डॉलर लेव्हलवर होते.
- एमसीएक्सवर सोने २८,८५१ रुपये प्रति १० ग्राम लेव्हलवर आले आहे. ७ सप्टेंबरला हे ३०,३६१ रुपयांच्या लेव्हलवर होते.
- दिल्ली बुलियन मार्केटमध्ये ८ सप्टेंबरला सोने ३१,०२५ रुपयांच्या लेव्हलवर होते. सराफांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या किमती २९,५०० रुपयांच्या लेव्हलखाली आल्या आहेत. म्हणजे ३ महिन्यात सोने सुमारे १६०० रुपये प्रति १० ग्रॅम खाली आले आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, सोन्यात का झाली घट... पुढे कशा राहतील किमती...

बातम्या आणखी आहेत...