आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीओ बाजारासाठी वर्ष ठरणार फायदेशीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय आयपीओ बाजारासाठी २०१६ हे वर्ष खूपच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे ५० कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात १९,४९३ कोटी रुपये जमा केले आहेत. या वर्षी आणखी २२ कंपन्या आयपीओ आणणार आहेत. यामुळे बाजारातून १९,२९४ कोटी रुपये जमा होऊ शकतात. यामुळे वर्षभरात आयपीओच्या माध्यमातून जमा झालेला अाकडा वाढून ३८,७८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी या माध्यमातून जमा झालेल्या १४,५०४ कोटी रुपयांपेक्षा हा आकडा अडीचपट जास्त असल्याचा दावा बेकर अँड मॅकेंझीच्या अहवालात करण्यात आला आहे.
भारतीय आयपीओ बाजार सहा वर्षांतील सर्वात उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. २०१७ मध्ये १६ कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होण्याची तयारी करत आहेत. या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ३८,९८७ कोटी रुपये जमा करू शकतात. यामध्ये व्होडाफोनच्या १९,९५९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित आयपीओचा समावेश आहे. हा आयपीओ कोल इंडियाच्या आयपीओला मागे टाकत देशातील सर्वात मोठा आयपीओ बनण्याची शक्यता आहे.

तेजीचे कारण
{ यामुळे भारत आर्थिक सुधारणांसाठी प्रतिबद्ध असल्याचा संदेश जगभरात जाईल.
{ यामुळे जगभरातील गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होतील.
{ सरकारच्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ मोहिमेमुळे बाजाराला मजबुती मिळाली आहे.
{ या प्रयत्नांमध्ये करप्रणालीला तर्कसंगत बनवण्याचादेखील समावेश आहे.
{ जीएसटीमुळे प्रत्यक्ष करासोबतच अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्स) संग्रहदेखील वाढणार आहे.

२०१७ मध्येही बाजार सकारात्मक
Ãआयपीओच्या बाजारातील ही तेजी यावर्षीबरोबरच पुढील वर्षीदेखील सुरू राहील. आयपीओ बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांची मजबूत धारणा, व्यावसायिक विश्वासामध्ये सुधारणा, महागाईचा दबाव कमी होईल. तसेच विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह स्थिर राहण्याचे मुख्य योगदान असेल.
-अशोक ललवाणी, प्रमुख, बेकर अँड मॅकेंझी
बातम्या आणखी आहेत...