Home | Business | Share Market | he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr

पत्नीचे दागिने विकून सुरु केली होती Justdial, आता 4000 कोटींचे सम्राज्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2017, 03:17 PM IST

नवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते.

 • he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr
  नवी दिल्ली- काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची माहिती देणार आहोत, ज्याने पत्नीचे दागिने विकून बिझनेस सुरु केला. बिझनेस चालला नसता तर दागिने हातचे गेले असते. शिवाय त्यानंतर इन्व्हेस्ट करायला पैसेही नव्हते. हिंमत खचली असती ते वेगळेच. पण या व्यक्तीने एकाच संधीत योग्य निशाणा साधला. आज त्याची ४००० कोटींची कंपनी आहे. मोठमोठ्या सेमिनारमध्ये त्याची सक्सेसस्टोरी ऐकण्यासाठी लोक येतात.
  गॅरेजपासून सुरु केली कंपनी
  १९९६ मध्ये मुंबईच्या एका गॅरेजपासून जस्ट डायल ही कंपनी सुरु झाली होती. यासाठी या व्यक्तीला ५० हजार रुपयांची गरज होती. हाती पैसा नव्हता. म्हणून त्याने चक्क पत्नीचे दागिने विकले. त्यातून भांडवल उभे केले. त्यातून फर्निचर, कॉम्प्युटर आणि इतर साहित्य विकत घेतले. सहा कर्मचाऱ्यांपासून कंपनी सुरु केली. आज कंपनीचे बाजारमुल्य तब्बल ४००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
  पुढील स्लाईडवर वाचा... परिस्थितीपुढे सोडावे लागले शिक्षण... असे मिळवले यश...

 • he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr
  यामुळे सोडावे लागले शिक्षण
  या व्यक्तीचे नाव व्ही. एस. एस. मणि असे आहे. त्यांचे बालपण कोलकत्यात गेले आहे. दिल्ली विद्यापिठातून त्यांनी पदवी मिळवली. पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. परिस्थितीपुढे माघार घेत त्यांना सेल्समनची नोकरी करावी लागली. येथे त्यांना बिझनेस प्लॅनिंग समजले.
 • he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr
  हाती आले अपयश
  जस्ट डायलची आयडिया २२ वर्षांच्या वयापासूनच मणिच्या डोक्यात होती. तेव्हा तो युनायडेट डायाबेस इंडिया कंपनीच्या येलो पेजेससाठी काम करत होता. त्यानंतर त्याने १९८९ मध्ये आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. पण तेव्हा त्यांचे जास्त कनेक्शन नव्हते. त्यामुळे अपयशाला सामोरे जावे लागले. त्याने ट्रेडिशनल अनुभवाचा वापर बिझनेसमध्ये केला. इंटरनेटवर कमीत कमी निर्भर राहावे लागेल याच्या दिशेने प्रयत्न सुरु केला. २००० मध्ये डॉटकॉम बेस कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. तेव्हा मणिंच्या कंपनीला चांगला लाभ होत होता. २००७ मध्ये त्याने वेबबेस्ड व्हर्जन लॉंच केले.  
 • he sold wifes ornaments for capital, now company stands on 40000 cr
  असे मिळवले यश
  २०१३ मध्ये लोकल सर्च सर्व्हिस जस्ट डायलचा आयपीओ आला. त्याला गुंतवणुकदारांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. आयपीओ ११.६३ टक्के अधिक सबस्क्राईब झाला. लिस्टिंगच्या ६ महिन्यांमध्ये जस्ट डायल स्टॉक १७२ टक्क्यांनी वाढला. ५ ऑगस्ट २०१४ रोजी स्टॉक ऑलटाईम हाय १८९४.७० रुपयांवर गेला.

Trending