Home | Business | Share Market | here 1 lacks become 15 lacks in just one year term

1 वर्षात 1 लाखाचे झाले 15 लाख, श्रीमंतांमध्ये गुंतवणुकीसाठी स्पर्धा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2017, 01:08 PM IST

नवी दिल्ली- तुम्ही कधी विचार केला आहे का, की मुव्हीचे तिकीट विकत घेण्याऐवजी त्याची रक्कम कुठे गुंतवली तर केवळ ८ वर्षात त

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  नवी दिल्ली- तुम्ही कधी विचार केला आहे का, की मुव्हीचे तिकीट विकत घेण्याऐवजी त्याची रक्कम कुठे गुंतवली तर केवळ ८ वर्षात तुम्ही करोडपती व्हाल. हे खरंच स्वप्नासारखे वाटते. पण असे झाले आहे. लोकांना लाखो रुपयांचे रिटर्न मिळाले आहेत. आज आम्ही अशा गुंतवणुकीबाबत बोलतोय जेथे लोकांनी १ वर्षासाठी १ लाख रुपये लावले आणि त्यानंतर ते चक्क १५ लाख झाले. गेल्या ८ वर्षांचा विचार केला तर १५० रुपये गुंतवणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून ९० कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

  येथे गुंतवणुकीसाठी जगभरातील श्रीमंतांमध्ये स्पर्धा लागली आहे. सीएनएन मनी रिपोर्टनुसार, अब्जाधीशांनी कोट्यवधी रुपये यात गुंतवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची प्रकरणे वाढली आहेत. भारतातून प्रत्येक महिन्याला २५० कोटी रुपये यात गुंतविले जाते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जाणून घ्या अशा गुंतवणुकीबाबत ज्यात केवळ एका वर्षात १५०० टक्के रिटर्न मिळाला आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, यात गुंतवणूक केलेल्या लोकांना मिळाला आहे असा रिटर्न....

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  9.75 लाख झाली किंमत
  आम्ही बोलतोय ते बिटक्वॉईनबद्दल. सध्या ही डिजिटल करन्सी चांगलीच चर्चेत आहे. भारतातून ज्या लोकांनी यात गुंतवणूक केलीआहे त्यांना चांगला नफा मिळाला आहे. सीएनबीसी रिपोर्टनुसार बिटक्वॉईन ऑलटाईम हाय १५ हजार डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच एका बिटक्वॉईनची किंमत ९.७५ लाख रुपये झाली आहे. १ वर्षापूर्वी याची किंमत ६५ हजार होती. म्हणजेच केवळ एका वर्षात १५ पटीने वाढ झाली आहे. 

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  १५० रुपयांचे झाले ९७ कोटी
  - ८ वर्षांपूर्वीचे बोलायचे झाले तर एका बिटक्वॉईनची किंमत केवळ १५ पैसे होती. म्हणजेच तेव्हा ज्यांनी केवळ १५० रुपये गुंतवले त्यांना आता ९७ कोटी रुपये मिळाले आहेत.
  - बिटक्वॉईनची मार्केट व्हॅल्यू २३० अब्ज डॉलर म्हणजेच १२.९५ लाख कोटी रुपये झाली आहे. जगातिक अनेक देशांच्या इकॉनॉमी यापेक्षा लहान आहे.

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  श्रीमंतांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा
  - बिटक्वॉईन ही काही फिजिकल करन्सी नाही. हा केवळ कोड किंवा व्हर्च्युअल टोकन आले. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती हस्तांतरीत केली जाते. त्यासाठी पहिल्या व्यक्तीला योग्य रक्कम अदा करावी लागते.
  - जगभरातील श्रीमंत यात गुंतवणूक करण्यासाठी सरसावले आहेत. या करन्सीच्या मदतीने तुुम्ही काही विकत घेऊ शकत नाहीत. केवळ त्याचे आदान-प्रदान केले जाते.

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  बिटक्वॉईनशी निगडित खास बाबी
  - या करन्सीवर एखादे सरकार किंवा देशाचे नियंत्रण नाही. ही डिजिटल स्वरुपात असते. तशीच ती ट्रान्सफर केली जाते. एखाद्या बॅंकेनेही ही करन्सी जारी केलेली नाही.
  - एका प्रश्नाचे ऑनलाईन उत्तर दिल्याने बिटक्वॉईन मिळू शकते. तसेच त्याची बाजारमुल्य देऊनही विकत घेता येते.
  - बेकायदेशीर व्यवहारांमध्ये बिटक्वॉईनचा मोठा वापर होतो. त्यामुळे बऱ्याच देशांनी यावर बंदीही घातली आहे.
  - याची किंमत कशी वाढते आणि घटते याबाबत कायम रहस्य राहिले आहे.

 • here 1 lacks become 15 lacks in just one year term

  आरबीआयने जारी केल्या गाईडलाईन्स

  आरबीआयने बिटक्वॉईनच्या व्यवहारांबाबत गाईडलाईन्स जारीकेल्या आहेत. या करन्सीच्या ट्रेडिंगला कोणतेही लायसन्स देण्यात आलेले नाही. ही असुरक्षित करन्सी असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
   

Trending