आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबल करा तुमचा PF फंड, EPFO च्या या नियमाचा असा उचला फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुमची प्रॉव्हिडंट फंडची रक्कम डबल किंवा त्यापेक्षा जास्त करु शकता. कर्मचारी भविष्य निधी संगठन (ईपीएफओ) याच्या नियमाचा फायदा उचलून तुम्ही असे करु शकता. यातून तुम्ही पीएफवर मिळणाऱ्या गॅरंटिड रिटर्नचा लाभ घेऊ शकता. सध्या ईपीएफओ पीएफवर ८.६५ टक्के वार्षिक रिटर्न देत आहे. सध्याच्या कोणत्याही सरकारी स्कीमपेक्षा हा लाभ जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की पीएफची मिळणारी रक्कम दुप्पट करण्यासाठी तुम्ही काय करु शकता.

 

मंथली कॉन्ट्रिब्युशन वाढवू शकता
इम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड अॅक्टनुसार कोणताही सदस्य कर्मचारी पीएफमधील मंथली कॉन्ट्रिब्युशन वाढवू शकतो. प्रत्येक महिन्याला बेसिक सॅलरी आणि डीएच्या १२ टक्के कॉन्ट्रीब्युशन केले जाते. तसेच १२ टक्के कंपनी कॉन्ट्रिब्युट करते. तुम्ही तुमचे मंथली कॉन्ट्रिब्युशन वाढवू शकता. बेसिक सॅलरीच्या १०० टक्केही तुम्ही कॉन्ट्रिब्युट करु शकता. पण या केसमध्ये कंपनीचे कॉन्ट्रिब्युशन मात्र १२ टक्केच राहिल हेही लक्षात असू द्या.

 

जाणून घ्या आकड्यांची भाषा

गुंतवणुकीचा अवधी- २८ वर्षे
मंथली कॉन्ट्रिब्युशन- १२ टक्के
सध्याचे रिटर्न- ८.६५ टक्के
सॅलरीत वार्षिक वाढ- १० टक्के
एकूण पीएफ फंड- १.२४ कोटी


(नोट- हे कॅलक्युलेशन १५ हजार रुपये बेसिक सॅलरीवर करण्यात आले आहे.)

 

पुढील स्लाईडवर वाचा, उदाहरणासह जाणून घ्या किती केले कॉन्ट्रिब्युशन तर किती होईल फायदा... असे आहेत नियम... टॅक्स रिटर्न भरताना असा होईल लाभ....

बातम्या आणखी आहेत...