आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीची करचुकवेगिरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाच ते सहा हजार काेटी रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या माेठ्या संघटित टाेळीला वेसण घालण्यासाठी सेबीने कंबर कसली अाहे. ही टाेळी काळा पैसा पांढरा करताना शेअर बाजाराचा वापर करीत असल्याचा सेबीला संशय अाहे. या टाेळीने भांडवल बाजारात थाटलेली दुकाने नेस्तनाबूत करण्यासाठी बाजार नियंत्रक कसाेशीने प्रयत्न करीत अाहे.

सेबीने ९०० पेक्षा जास्त कंपन्यांना भांडवल बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातलेली असून काही करचुकवेगिरीची प्रकरणे पुढील चाैकशीसाठी प्राप्तिकर खात्याकडे पाठवली अाहेत. या प्रकरणांमध्ये पाच ते सहा हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त कर चुकवला असल्याचे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सांगितले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला अाम्ही सर्व तपशील दिलेला असून त्याबाबत चाैकशी करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. अायपीअाे बाजारात काही लाेकांनी अापली दुकानेच थाटली असल्याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधले.