आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Rupee At 66.84 Per $1 Vs 66.7500 Earlier; 66.5600 Friday

महागाई भडकणार; $ च्या तुलनेत ₹ दोन वर्षाच्या नीचांक पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मागणी वाढल्याने मुद्रा बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरला. रुपया दोन वर्षात अत्यंत खालच्या स्तरावर घसरला आहे. रुपयाच्या अवमुल्यनामुळे अन्न-धान्यासह अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी बाजार उघडताच अवघ्या अर्धा तासात भारतीय रुपया डॉलरच्या तुलने 66.88 वर घसरला. अशी परिस्थिती 2013 मध्ये निर्माण झाली होती. 23 सप्टेंबर, 2013 रोजी रुपया नीचांक पातळीवर पोहोचला होता. रुपया घसरण्याला अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये आलेली तेजी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात गरजेच्या 80 टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. रुपयाची घसरणीमुळे आयात महाग होईल आणि त्यामुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अचानक महागाईही वाढू शकते. त्यामुळे सामन्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्थिक आघाडीवरील अपयश सर्वात मोठे कारण
तज्ज्ञांच्या मते, आर्थिक आघाडीवर सरकारचे अपयश हे रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर लावण्यात आलेला किमान पर्यायी कर आणि त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था, मार्चच्या तिमाहीतील कंपन्यांचे निराशाजनक आर्थिक निकाल यांचा हा परिणाम आहे. विदेशी गुंतवणूकदार चीन आणि सिंगापूरकडे वळत आहे. त्यामुळे ही घसरण असल्याचे मानले जाते. एका अहवालानुसार, रुपया 69 पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय सांगितली तज्ज्ञांनी रुपयाच्या घसरणीची कारणे...