आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Companies Sing IPO Tune, Line Up Rs 9,000 crore Offers

तेजीच्या आधारे खुलणार २० हजार कोटींचे आयपीओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजारात प्राथमिक सार्वजनिक विक्री प्रस्तावांची (आयपीओ) लाट येणार आहे. बाजार नियामक सेबीकडे दाखल असलेल्या दस्तऐवजांवरून मागील तीन आठवड्यांत सुमारे डझनभर कंपन्यांनी भारतीय भाडवल बाजार नियामक व नियंत्रक-सेबीकडे आयपीओसाठी डीआरएचपी जमा केले आहेत. यात बँकिंग, लॉजिस्टिक्स, मीडिया आणि पायाभूत संरचना क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

बाजारातील जाणकारांच्या मते, चालू आर्थिक वर्षात आयपीओच्या बाजारात सुगी परतण्याची शक्यता आहे. मर्चंट बँकर्सच्या मते, आयपीओ बाजाराला आगामी काळात नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच भांडवली बाजाराने साथ दिली तर हा कल चांगलाच वाढीस लागणार आहे. कोटकच्या मते, सेबीकडे अलीकडेच जमा झालेल्या दस्तऐवजांनुसार येत्या १२ ते १५ महिन्यांत सुमारे २० हजार कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात ज्या कंपन्यांनी सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यात कॅथॉलिक सिरियन बँक, दिलीप बिल्डकॉन आणि मीडियातील अमर उजाला प्रकाशनाचा समावेश आहे. आगामी काही महिन्यांत बहुतेक मध्यम कंपन्या आयपीओ आणण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात काही बड्या कंपन्याही आयपीओ आणतील. मागील गुरुवारीही पाच कंपन्यांनी सेबीकडे आपली कागदपत्रे जमा केली आहेत, तर या वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत ७ दस्तऐवज जमा झाले होते.

नोंदणीचे नियम सुलभ
सेबी लवकरच आयपीओसंदर्भातील नियम सुलभ बनवणार आहे. नव्या कॉमर्स कंपन्यांना आयपीओसाठी नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयपीओ आणण्यासाठी कंपनी नफ्यात असावी, अशी अट रद्द करण्यात येणार आहे. सेबी ही अट रद्द करणार आहे, मात्र कंपन्यांना त्यांची स्थिती गुंतवणूकदारांना स्पष्टपणे सांगावी लागणार आहे. वित्त मंत्रालयाच्या एक अधिकार्‍याने सांगितले, अनेकदा कंपन्यांना रोख रकमेची चणचण असते.

२००७ मध्ये उभे केले ३४ हजार कोटी
शेअर बाजाराची स्थिती २००७ प्रमाणे असती तर आयपीओही यशस्वी ठरले असते. २००७ मध्ये बाजार तेजीच्या लाटेवर स्वार होता. तेव्हा १०८ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ३४ हजार कोटी रुपये उभारले होते.

आयपीओ बाजार सुधारण्याचे संकेत
सेबीचे चेअरमन यू. के. सिन्हा यांच्या मते, येत्या ६ ते ९ महिन्यांत प्राथमिक बाजाराची स्थिती सुधारणार आहे. अलीकडेच काही कंपन्यांनी डीआरएचपी दाखल केले आहेत, तर सेकंडरी बाजार उत्तम कामगिरी करताहेत.

अलीकडच्या आयपीओला थंडा प्रतिसाद
अलीकडेच आलेल्या काही आयपीओंना थंडा प्रतिसाद मिळाला आहे. अडलॅब्ज एंटरटेनमेंटचा आयपीओ सबस्क्रिप्शन कालावधी तीन दिवस वाढवावा लागला होता. याशिवाय त्याची ऑफर प्राइस २२१ ते २३० रुपयांवरून घटवून १८० ती २१५ रुपये करावी लागली होती. केबल व ब्रॉडबँड क्षेत्रातील ऑरटेल कम्युनिकेशन्सचा आयपीओ कसाबसा पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. जानेवारीत खाद्यतेल कंपनी एन. सीएमएल इंडस्ट्रीजला किरकोळ गुंतवणूदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला, शेवटी हा आयपीओ परत घ्यावा लागला होता.