आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India's GDP Growth Declined To Estimate The Cost, Sensex , While The Nifty Points

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या जीडीपी विकास दराच्या अंदाजात घट ,सेन्सेक्स ४४, तर निफ्टी १५ अंकांनी वधारला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुणांकन संस्था फिचने भारताच्या जीडीपी विकास दराच्या अंदाजात घट केल्यामुळे भारतीय शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. दिवसभराच्या व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स २०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत हाेता. नंतर मात्र फिचने अंदाजात घट केल्याची बातमी येताच शेअर बाजारात जोरदार विक्रीचा मारा दिसून आला.
व्यवहाराच्या शेवटी ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४ अंकांच्या वाढीसह २६,३९४ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १५ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८१४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात चढ-उतार दिसून आला. शेअर बाजाराला ऑटो आणि दूरसंचार स्टॉक्समुळे मोठा आधार मिळाला. निफ्टीमध्ये आॅटो, रिअल्टी आणि मीडिया इंडेक्स हिरव्या निशाणीवर बंद झाले.
बातम्या आणखी आहेत...