आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा ८ महिन्यांतील नीचांक, रिझर्व्ह बँकेची भूमिका आताच सांगणे कठीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वस्त भाजीपाला अाणि इंधनाच्या िकमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईने सलग अाठव्या महिन्यात घसरणीचा सूर कायम ठेवला अाहे. जून महिन्यात घाऊक महागाई कमी हाेऊन ती मे महिन्यातील उणे २.३६ टक्क्यांवरून उणे २.४ टक्क्यांवर अाली अाहे, परंतु डाळी मात्र अजूनही महागच अाहेत.

वर्षभरापूर्वी म्हणजे जूनमध्ये ही महागाई ५.६६ टक्क्यांपर्यंत वाढली हाेती, परंतु नाेव्हेंबर २०१४ पासून ती सातत्याने नकारात्मक पातळीवर अाहे. िकरकाेळ महागाई जून महिन्यात अाठ महिन्यांच्या कमाल पातळीवर म्हणजे ५.४ टक्क्यांनी वाढली अाहे.
घाऊक पातळीवर गेल्या
महिन्यात खाद्यान्न विशेषकरून गहू, फळे अाणि दुधाच्या िकमती कमी झाल्या. त्यामुळे खाद्यान्न गटातील एकूण घाऊक महागाईचे प्रमाण मे महिन्यातील ३.८० टक्क्यांवरून
कमी हाेऊन ते २.८८ टक्क्यांवर अाले अाहे.

रिझर्व्ह बँकेची भूमिका आताच सांगणे कठीण
यंदाच्या वर्षात िरझर्व्ह बँकेने अातापर्यंत तीनवेळा व्याजदर कमी केले अाहेत, परंतु अाता रिझर्व्ह बँकेचे पुढचे धाेरण काय असेल याबाबत अाताच अंदाज बांधता येणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले अाहे. िरझर्व्ह बँक महागाईबराेबरच पावसाच्या प्रगतीचाही अाढावा घेईल.