Home | Business | Share Market | Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs

25 हजारांची गुंतवणूक, आठ वर्षांनी मिळाले 1 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2017, 12:13 PM IST

नवी दिल्ली - आजच्या स्पर्धेच्या युगात असा कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही, जो श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत नाही. असंख्य

 • Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs
  नवी दिल्ली - आजच्या स्पर्धेच्या युगात असा कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही, जो श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत नाही. असंख्य लोक करोडपती होण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतात. मात्र, तरीही यशापासून कोसो दूर असतात. तुम्ही तुमच्या पैशांची गुंतवणूक कुठे करता, गुंतवणूकीवर मिळणारे रिटर्नस् महत्त्वाचे असतात. थोडा विचार करा, फक्त 25 हजारांची गुंतवणूक करून आठ वर्षांत एक कोटी रुपये म्हणजेच 400 पट नफा मिळू शकतो. ज्या गुंतवणूकदारांनी याठिकाणी 8 वर्षापूर्वी 25 हजारांची गुंतवणूक केली होती, ते आज करोडपती झाले आहेत.
  पुढील स्लाईडवर वाचा - याठिकाणी गुंतवणूक केल्यावर मिळू शकतो 400 पट नफा

 • Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs
  8 वर्षात 400 पट नफा
   
  - चारशे पट नफा देणारी कंपनी आहे बजाज फायनान्स.
  - या कंपनीच्या एका शेअरची किंमत 2009 मध्ये 4.5 रुपये एवढी होती. हाच शेअर 31 ऑगस्ट 2017 ला वाढून 1803 रुपयांवर पोहोचला. 
  - तेव्हा ज्यांनी या शेअरमध्ये 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून आजपर्यंत वाट पाहिली. ते आज करोडपती झालेले आहेत. 
   
  पुढील स्लाईडवर वाचा - 8 वर्षात किती वाढली कंपनीची संपत्ती
 • Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs
  कंपनीच्या संपत्तीत झाली 570 पटींची वाढ
   
  - मार्च 2009 मध्ये कंपनीचे एकूण मार्केट कॅप 175 कोटी रुपये इतके होते.
  - 31 ऑगस्टला कंपनीचे मार्केट कॅप 175 कोटी रुपयांवरून 98074 कोटी रुपयांवर पोहोचले. 
  - अर्थातच अवघ्या आठ वर्षात कंपनीच्या संपत्तीत 570 पट वाढ झाली. याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला. 
   
  पुढे वाचा - करोडपती करणारी आणखी एक गुंतवणूक
 • Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs
  5 वर्षात झाली 81 पट वाढ
   
  - पाच वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी अवंती सिड्स या कंपनीच्या 1.25 लाख रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक केली. त्यांना आजघडीला 1 कोटी रुपये मिळतील. 
  - अवंतीच्या शेअर्सची किंमत जून 2012 मध्ये 23 रुपये एवढी होती. याच शेअरची किंमत 31 ऑगस्ट 2017 ला 1877 एवढी झाली. 
  - याचाच अर्थ शेअरधारकांना गुंतवणूकीवर 81 पट परतावा मिळून ते करोडपती झाले. 
   
  पुढे वाचा - या कंपनीचेही शेअरधारक झाले करोडपती 
 • Here 25000 rs investment become 1 crore in just 8 yrs
  17 वर्षात 70 पट रिटर्न
   
  - एशियन पेंटस या कंपनीच्या शेअरची किंमत 17 वर्षात 70 पटीने वाढली. 
  - 3 जानेवारी 2000 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 16.25 रुपये एवढी होती. 31 ऑगस्ट 2017 ला या कंपनीच्या एका शेअरची किंमत वाढून 1171 इतकी झाली. 
  - याचाच अर्थ ज्यांनी 2000 साली 1.45 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, ते आज करोडपती झाले आहेत. 

Trending