Home | Business | Share Market | More than 100 stocks surge 1000 percent or more

शेअर बाजारात 10 हजारांचे करा 1 लाख रुपये, ही आहे स्ट्रॅटेजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2017, 04:56 PM IST

नवी दिल्ली - स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण सुरु आहे. या तेजीने असंख्य शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल

 • More than 100 stocks surge 1000 percent or more
  नवी दिल्ली - स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण सुरु आहे. या तेजीने असंख्य शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या शेअरच्या रकमांतही भरघोस वाढ झालेली आहे. पुढेही ही तेजी कायम राहण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल...
  काय आहे मल्टीबॅगर स्टॉक्स
  - बॅगर, टेन बॅगर आणि मल्टी बॅगर गुंतवणूकदारांतील बोलीभाषेतील शब्द आहेत. यातून कळते की स्टॉक्स खरेदीपेक्षा कितीपटीने वाढला आहे.
  - साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास 100 टक्क्यांनी वाढलेल्या स्टॉक्सला मल्टी बॅगर म्हणतात.
  - सबसे पहले या शब्दांचा वापर दिग्गल फंड मॅनेजर पीटर लिंच यांनी आपल्या वन अप ऑन वॉल स्ट्रीट या पुस्तकात केलेला आहे.
  - लिंच फिडिलिटी इन्वहेस्टमेंटमध्ये 1977 ते 1990 दरम्यान मॅनेजर होते. 14 वर्षात त्यांची गुंतवणूक 2 कोटी डॉलरहून 1400 कोटी डॉलर झाली होती.
  पुढे वाचा - कोणत्या स्टॉक्सने दिले सर्वाधिक रिटर्न

 • More than 100 stocks surge 1000 percent or more
  हे आहेत टॉप मल्टीबॅगर स्टॉक्स
   
  मागील एक वर्षात इंडियाबुल्स व्हेंचर्स आणि गोल्डस्टोन इंफ्राटेक 8 पटीने, तर जिंदल वर्ल्डवाईड आणि फ्युचरमार्केट 4 पटीने वाढले. 
  मागील तीन वर्षात 40 पेक्षा अधिक स्टॉक्सने टेनबॅगर अथवा त्यापेक्षा जास्त नफा दिलेला आहे. यामध्ये कुशल ट्रेडलिंकने 50 पट नफा दिला. या स्टॉक्समध्ये केवळ एक स्टॉक बीएसई 500 मध्ये समाविष्ट आहे. तीन वर्षाच्या दरम्यान स्पाईसजेट 10 पटीने वाढला.
  पाच वर्षात बीएसई स्टॉक्समध्ये समाविष्ट असलेल्या 12 स्टॉक्सने दहा पटपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. याव्यतरिक्त 100 स्टॉक्सने 1000 पटीपेक्षा जास्त नफा गुंतवणूकदारांना कमावून दिला आहे. 
   
  पुढे वाचा - एक्सपर्ट कशी करतात मल्टी बॅगरची निवड
   
 • More than 100 stocks surge 1000 percent or more
  लहान स्टॉक्समध्ये मल्टीबॅगर बनण्याची संधी अधिक
   
  व्हीएम फायनान्शिअलचे रिसर्च हेड विवेक मित्तल म्हणाले की, नफ्याचा अभ्यास केल्यास जास्तीत जास्त नफा हा लहानलहान कंपन्याच देतात. या लहानलहान कंपन्यात सुरवातीला केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते. या कंपन्याचे स्टॉक्स भविष्यात अधिक मजबूत होण्याची दाट शक्यता असते. कारण, लहान कंपन्या रिझल्ट ओरिएंटेड काम करतात. 
   
  पुढे वाचा - मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल 
   
 • More than 100 stocks surge 1000 percent or more
  परफार्मन्सवर अधिक भर
   
  एपिक रिसर्चचे सीईओ मुस्तफा नदीम यांनी सांगितले की, परफॉर्मन्सच्या आधारे मल्टीबॅगर स्टॉक ओळखले जातात. या कंपन्यांचे मल्टीबॅगर स्टॉक्स ओळखण्यासाठी अनेक पॅरामीटरचा अभ्यास करावा लागतो. स्टॉक्सच्या परफॉर्मन्ससह कंपनीच्या फंडामेंटल गोष्टींवरही नजर ठेवावी लागते. त्याचबरोबर व्हॅल्यूएशनवरसुद्धा नजर ठेवावी लागते. यामध्ये प्रामुख्याने पीई रेशो, कंपनीवर असलेला कर्जाचा बोजा याआधारेही मल्टीबॅगर स्टॉक्सची निवड केली जाते. 
   
  पुढे वाचा - राहा सावधान
   
 • More than 100 stocks surge 1000 percent or more
  या बाळगा सावधानी
   
  कॅपीटल सिंडिकेटचे व्यवस्थापक सुब्रमण्यम पशुपती म्हणाले, की गुंतवणूकदारांनी स्थिर आणि मजबूत स्टॉक्सची निवड करायला हवी. कारण, स्टॉक्सचा कालावधी नफ्यावर परिणाम करीत असतो. जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी सुरवातीला लहानलहान गुंतवणूक करायला हरकत नाही. स्टॉकमध्ये नफा सुरु झाल्यानंतर गुंतवणूक वाढवायला हवी. 
  विवेक मित्तल म्हणाले की, गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्यांचा आढावा घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याच वेळा जास्त नफा मिळवून देणारे स्टॉक्स सुद्धा मार खातात. अशावेळी गुंतवणूकदारांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. 

Trending