Home | Business | Share Market | the Indian stock market rally

जागतिक संकेतानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी

वृत्तसंस्था | Update - May 09, 2017, 03:00 AM IST

जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि आशियाई बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातही सोमवारी तेजी नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, वाहन, आयटी, रिअॅल्टी, औषधी या क्षेत्रातील शेअरमध्ये खरेदी नोंदवण्यात आली. तर धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा मारा झाला.

  • the Indian stock market rally
    मुंबई- जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि आशियाई बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातही सोमवारी तेजी नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, वाहन, आयटी, रिअॅल्टी, औषधी या क्षेत्रातील शेअरमध्ये खरेदी नोंदवण्यात आली. तर धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा मारा झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ६७ अंकांच्या वाढीसह २९९२६ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २९ अंकांच्या वाढीसह ९३१४ या पातळीवर बंद झाला.

    भारतीय शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.५० टक्के आणि निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकात ०.६३ टक्क्यांची वाढ
    झाली आहे.

Trending