आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने झळाळीला घसरणीच्या कळा, सलग तिसऱ्या वर्षी नकारात्मक परतावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने सलग तिसऱ्या वर्षी नकारात्मक परतावा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याची मागणी ८ वर्षांच्या नीचांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे एसपीडीआर गोल्ड ट्रस्टमधील सोन्याचा साठा ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्यातच यंदा वर्षभरात सोन्याच्या किमतीत ९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली आहे.
आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या किमती ६ वर्षांच्या नीचांकावर आहेत. या सर्व घटकांचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही झाला आहे. देशात सलग दुसऱ्या वर्षी अनेक भागांत दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून सोन्याची मागणी कमी झाली आहे. नजीकच्या काळाचा विचार केल्यास सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. त्याचा नकारात्मक परिणाम मागणीच्या बाजूने होऊ शकतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा २० वर्षांत प्रथमच दिवाळीत सोन्यावर सवलत