Home | Business | Share Market | invest in Modi Govt scheme and get 40 k monthly income

मोदींच्या या स्कीमचा उचला फायदा, 40 हजारांपर्यंत मिळू शकते मंथली इन्कम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 22, 2017, 11:23 AM IST

नवी दिल्ली- तुम्हाला कमी गुंतवणूक करुन बिझनेस सुरु करायचा असेल तर मोदी सरकारची ही स्कीम तुमच्या कामाची आहे.

 • invest in Modi Govt scheme and get 40 k monthly income

  नवी दिल्ली- तुम्हाला कमी गुंतवणूक करुन बिझनेस सुरु करायचा असेल तर मोदी सरकारची ही स्कीम तुमच्या कामाची आहे. या स्कीमचा वापर करुन अत्यंत कमी भांडवलासह तुम्ही नवीन बिझनेस सुरु करु शकता. यासाठी तुमच्याकडे ५०० वर्गफुटाचे जागा असणे आवश्यक आहे. एवढी जागा नसेल तर तुम्ही ही जागा भाड्यानेही घेऊ शकता.

  आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या अशा स्कीमची माहिती देणार आहोत, ज्या अंतर्गत तुमचे गुंतवणूक केवळ २ लाख रुपये असेल पण तुमचे मंथली इन्कम ३५ ते ४० हजार रुपयांच्या घरात असेल. तसेच व्यवसाय अशा प्रोडक्टचा ज्याची बाजारपेठेत कायम मागणी असते. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करताना दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. पहिला बिझनेसमध्ये किती पैैसे गुंतवायचे आहेत आणि दुसरे त्यातून नफा किती मिळवायचा आहे. या स्कीममध्ये या दोन्ही बाबींचा विचार करण्यात आला आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या कशी आहे स्कीम... कोणता आहे हा बिझनेस...

 • invest in Modi Govt scheme and get 40 k monthly income

  सुरु करा हा बिझनेस
  स्मॉम इंडस्ट्रीजशी निगडित एका पॉप्युलर बिझनेस पापड म्यॅन्युफॅक्टरींग आहे. पापड किचनमधील एका महत्त्वपूर्ण घटक आहे. संपूर्ण वर्षभर याची मागणी असते. हे प्रोडक्ट क्वॉलिटीवर विकले जाते. तुम्ही क्वॉलिटी टिकवून ठेवली तर यश मिळू शकते.

   

  किती होईल खर्च
  - तुम्हाला २ लाख रुपये खर्च करावे लागेल
  - एकूण खर्च येईल सुमारे १० लाख रुपये
  - मोदी सरकार ८० टक्के आर्थिक मदत देईल
  - सरकारच्या मुद्रा स्कीममधून ८ लाख रुपये लोन मिळेल.

   

  नोट- १० लाखांच्या खर्चात मशिनरी, लेबर चार्ज, वीज, सॅलरी, रॉ मटेरिअल आणि इतर खर्च सामिल आहे.

 • invest in Modi Govt scheme and get 40 k monthly income

  अशी होईल कमाई
  वार्षिक कॉस्ट ऑफ प्रोडक्शन- २८.३० लाख
  वार्षिक टर्नओव्हर- ३३.५० लाख
  वार्षिक प्रॉफिट- ५.२० लाख
  मंथली प्रॉफिट- ४० हजारांपेक्षा जास्त

   

  नोट- सरकारने इस्टिमेट तयार केले आहे. यात प्रोडक्शन कॉस्टनुसार टर्नओव्हर रेश्यो काढण्यात आला आहे.

   

  वार्षिक रिटर्न- ५४ टक्के
  ५.४ लाख (नेट प्रॉफिट) X 100/10
  लाख (एकूण गुंतवणूक)=54%
  म्हणजे दोन वर्षांत पूर्ण गुंतवणूक निघेल

 • invest in Modi Govt scheme and get 40 k monthly income

  असे करा अप्लाय
  पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी कोणत्याही बॅंकमध्ये तुम्ही अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला एका फॉर्म भरावा लागेल. त्यात या डिटेल्स द्याव्या लागतील...नाव, पत्ता, बिझनेस सुरु करण्याचा अॅडरेस, एज्युकेशन, सध्याचे इन्कम आणि किती लोन हवे. यात प्रोसेसिंग किंवा गॅरंटी फी नसते. लोनची रक्कम चार वर्षात परत करावी लागते.

Trending