Home | Business | Share Market | IT Dept scan your financial profile when you do these 10 works

PAN वरुन तुम्हाला असे ट्रॅक करतात IT अधिकारी, हे 10 काम करताना राहा अलर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 05, 2017, 02:16 PM IST

नवी दिल्ली- खरेदी-विक्री करताना अनेकदा काळापैसा वापला जातो. अशा वेळी पॅनकार्ड न देता असे व्यवहार केले जातात.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  नवी दिल्ली- खरेदी-विक्री करताना अनेकदा काळापैसा वापला जातो. अशा वेळी पॅनकार्ड न देता असे व्यवहार केले जातात. पण केंद्र सरकारने आता कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार करताना आधी पॅन डिटेल्स द्यावे लागतात. या डिटेल्सच्या माध्यमातून सरकार तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते. तसेच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे, की नाही हेही चेक केले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा १० कामांची माहिती देणार आहोत जे करताना सरकारचे तुमच्यावर लक्ष असते...

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या ही १० महत्त्वपूर्ण कामे....

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  व्हेईकल विकत घेताना
  दुचाकी विकत घेताना पॅनकार्ड डिटेल्स द्यावे लागत नाहीत. पण त्यापेक्षा जास्त रकमेचे व्हेईकल विकत घेताना पॅनकार्डचे सगळे डिटेल्स द्यावे लागतात. त्यावरुन तुमची फायनान्शिअल प्रोफाईल तयार होते.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  प्रॉपर्टी खरेदी-विक्री
  तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर प्रॉपर्टी खरेदी करणे आणि विकणे जवळपास अशक्य आहे. सरकारने निश्चित केले आहे, की १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवहार असेल तर तुम्हाला पॅनकार्ड डिटेल्स देणे आवश्यक आहे.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  क्रेडिट-डेबिट कार्ड घेताना
  तुम्हाला डेबिक किंवा क्रेडिट कार्ड हवे असेल तर पॅनकार्डचे डिटेल्स देणे आवश्यक आहे. त्याशिवाय या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  विमा घेताना
  १ जानेवारीपासून इन्कम टॅक्स विभागाने विमा प्रिमियमवरही नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त प्रिमियम वार्षिक भरत असाल तर तुम्हाला पॅनकार्डचे डिटेल्स द्यावे लागतील.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  हॉटेल, रेस्तरॉंत ५० हजारांपेक्षा जास्त बिल
  तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्तरॉंत गेले आणि ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बिल झाले असेल तर पॅनकार्ड डिटेल्स द्यावे लागतील. तुम्ही कॅश पेमेंट करणार असाल तर असे तुम्हाला करावेच लागेल.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  डिबेंचर किंवा बॉंड खरेदी करताना
  - डिबेंचर्स किंवा बॉंड खरेदी करताना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर पॅनकार्ड डिटेल्स द्यावे लागेल. यासंदर्भात आरबीआयने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  म्युचल फंड खरेदीसाठी
  म्युचल फंड युनिट्स खरेदी करताना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करायचे असेल तर पॅनकार्ड डिटेल्स द्यावे लागेल. हे आवश्यक करण्यात आले आहे.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  २ लाखांपेक्षा जास्त खरेदी-विक्री करताना
  २ लाखांच्या वरचा व्यवहार कॅस करता येत नाही. याबाबत सरकारने निर्देश दिले आहेत. त्याच्या वरचा व्यवहार करताना पॅनडिटेल्स देण्याची गरज आहे.

 • IT Dept scan your financial profile when you do these 10 works

  सिक्युरिटी सेल किंवा खरेदी
  १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची सिक्युरिटी खरेदी विक्री करताना तुम्हाला पॅनडिटेल्स द्यावे लागेल. त्याशिवाय खरेदी करता येणार नाही.

Trending