Home | Business | Share Market | IT dept would strictly examine revised ITR because of black money

रिवाइज्ड ITR ची सक्तिने होणार तपासणी, जास्त टॅक्स वसूल करण्याचे निर्देश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 27, 2017, 12:54 PM IST

नवी दिल्ली- नोटबंदीनंतर रिवाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करणाऱ्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांची सक्तिने तपासणी क

 • IT dept would strictly examine revised ITR because of black money

  नवी दिल्ली- नोटबंदीनंतर रिवाइज्ड इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करणाऱ्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांची सक्तिने तपासणी करण्याचे निर्देश सीबीडीटीने दिले आहेत. आयटीआरमध्ये काही संशयास्पद आढळून आले तर जास्त टॅक्स वसून करण्याचे निर्देशही देण्यात आला आहेत.

  सीबीडीटीने रिजनल मुख्यालयांना दिले निर्देश
  इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॉलिसी मेकिंग बॉडिने डिपार्टमेटच्या सगळ्या रिजनल मुख्यालयांना २४ नोव्हेंबर रोजी दोन पानांचा एक निर्देश जारी केला आहे. यात फायनान्सिअल रेकॉर्डमध्ये काही संशयास्पद आढळून आले तर पुढील कारवाई कशी करायची याची माहिती देण्यात आली आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, याच्याशी संबंधित अतिरिक्त माहिती... असा लागेल जास्तीचा टॅक्स...

 • IT dept would strictly examine revised ITR because of black money

  या प्रकरणी लागेल जास्त टॅक्स
  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने सांगितले, की आयटी अॅक्ट सेक्शन ११५ बीबीई (ट्रीटमेंट ऑफ टॅक्स क्रेडिट्स) अंतर्गत लॉस, एक्सपेन्स आदीची मोजदाद करताना संशयास्पद व्यवहार आढळून आले तर जास्त टॅक्स वसूल करावा.

 • IT dept would strictly examine revised ITR because of black money

  अशी करता येईल तुलना
  सीबीडीटीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे, की वाढलेल्या सेल्सच्या (विशेष करुन टॅक्सपेयर्सच्या बिझनेस कॅटेगरीत) प्रकरणांमध्ये सेंट्रल एक्साईज-वॅट रिटर्न सोबत तुलना करता येईल. रिवाइज्ड रिटर्न भरुन काळापैसा पांढरा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. अशी स्वरुपाची काही प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे अशा रिटर्नची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 • IT dept would strictly examine revised ITR because of black money

  २० प्रकरणे आढळून आली
  एका वरिष्ठ आयटी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की अशा स्वरुपाचे २० हजार प्रकरणे आढळून आले आहेत. त्यांचे बारकाईने चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त टॅक्स आकारला जाणार आहे. ही कारवाई सक्तिने राबविली जाणार आहे.

   

Trending