Home | Business | Share Market | Know your railway waiting ticket would get confirm or not

ट्रेनचे वेटिंग तिकीट कम्फर्म होणार की नाही, असे जाणून घ्या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2017, 05:49 PM IST

नवी दिल्ली- एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की सुमारे ७० टक्के रेल्वे प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळते आणि तिकीट कम्फर्म

 • Know your railway waiting ticket would get confirm or not
  नवी दिल्ली- एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की सुमारे ७० टक्के रेल्वे प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळते आणि तिकीट कम्फर्म होईपर्यंत त्यांची चिंता कायम राहते. बऱ्याच गाड्यांचे वेटिंग प्रचंड असते. बऱ्याच वेळी तिकीट अगदी रिग्रेटपर्यंत गेलेले असते. अशा वेळी तुम्हाला बुकिंगही करता येत नाही. पण जर का वेटिंग तिकीट काढता येत असेल तरी तुम्ही बुचकळ्यात पडता की ते कम्फर्म होईल की नाही. तुम्ही वारंवार तुमचा पीएनआर क्रमांक टाकून प्रेझेंट स्टेट्स चेक करत राहता. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, की त्यातून तुम्ही सहज माहिती करुन घेऊ शकता की तिकीट कम्फर्म होईल की नाही. तेही काही सेकंदांमध्ये.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, तुम्ही वेटिंगचे तिकीट कसे काय कम्फर्म करु शकता...

 • Know your railway waiting ticket would get confirm or not
  कसे माहित करुन घेणार
  यासाठी तुम्हाला एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. railyatri.in या अॅपवर तुम्हाला ही सुविधा दिली जाते. त्यासाठी तुमच्या पीएनआर स्टेट्स आणि ड्रेनच्या वेटिंगचे अॅनॅलिसिस केले जाते. यात पीएनआर नंबर टाकण्यासाठी जागा दिली आहे. तेथे तुमचा पीएनआर फीड करा. त्यानंतर खाली दिलेले बटण दाबून जाणून घ्या तिकीट कम्फर्म होईल की नाही.
 • Know your railway waiting ticket would get confirm or not
  कशी माहिती मिळते
  या अॅॅपचे सीईओ मनिष सेठी यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांपासून आम्ही यावर काम करत आहोत. त्यासाठी अद्ययावत डाटा मिळवत आहोत. त्यासाठी प्रत्येक ट्रेनची वेळ, बुकिंगची वेळा, पीएनआय क्रमांक आदींचा विचार करुन रिझर्ल्ट डिस्प्ले केला जातो. तिकीट बुकिंगच्या ट्रेंडचाही विचार केला जातो. आम्ही शोध लावलेल्या अल्गोरिदमचा सक्सेस रेट तब्बल ९४ टक्के आहे.

Trending