आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठ महिन्यांतील नीचांकी पातळी, साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशीही मरगळ कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने अार्थिक सुधारणांबाबत सावत्र भूमिका घेतल्यापासून बाजारातील मरगळ वाढली अाहे. साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या िदवशीही मरगळ कायम राहिली. संभाव्य दुष्काळाबाबतही बाजारात िचंतेचे वातावरण अाहे. त्यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना माेठा फटका बसला. त्यामुळे सेन्सेक्स िदवसअखेर २४५ अंकांनी घसरला. सेन्सेक्सने गेल्या अाठ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्स १,३२६ अंकांनी घसरला अाहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा िनर्देशांक गेल्या सलग सहा सत्रांमध्ये घसरला. िनफ्टी साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या िदवशी िनफ्टी ७०.५५ अंकांनी घसरून ८०४४.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. या वर्षात फेडरल रिझर्व्ह यंदाच्या वर्षात व्याजदर वाढवण्याची शक्यता अाणि अमेरिकेच्या राेजगार कामगिरीत अपेक्षेपेक्षा झालेली सुधारणा यामुळेदेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
विक्रीचा दबाव
शेअर बाजारात विक्रीचा दबाव माेठ्या प्रमाणावर हाेता. िमडकॅप अाणि स्माॅलकॅप समभागांनादेखील विक्रीचा तडाखा बसला. अाैद्याेगिक उत्पादन अाणि महागाईची अाकडेवारी या अाठवड्यात जाहीर हाेणार असल्यानेदेखील गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार केले. त्याचाही बाजारावर परिणाम झाला.
रुपयादेखील घसरला
मधल्या सत्रात रुपयादेखील डाॅलरच्या तुलनेत घसरून ६४.१६ अंकांच्या पातळीवर अाला. सेन्सेक्स २६,८१४.३१ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. िकंमत घटलेल्या काही बड्या समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स २६,८२७.०५ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. परंतु त्यानंतर अचानक झालेल्या नफारूपी विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्सने नकारात्मक पातळीवर २६,४७२.८७ अंकांची खालची पातळी गाठली. िदवसअखेर सेन्सेक्स २४५.४० अंकांनी घसरून २६,५२३.०९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगाेदर २० अाॅक्टाेबरला सेन्सेक्स इतक्या अंशांनी घसरला हाेता.
बातम्या आणखी आहेत...