Home »Business »Share Market» Market Cap Of Mumbai Stock Market Surged To Rs 125 Lakh Crore

मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचा मार्केट कॅप125 लाख कोटींच्या वर

मुंबई शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप मंगळवारी पहिल्यांदाच १२५ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. बाजार बंद झाला त्या वेळी शेअर बाजारातील लिस्टेड ५,७१६ कंपन्यांचा मार्केट कॅप १२५,५३,५६१ कोटी रुपये झाला

दिव्य मराठी नेटवर्क | Apr 26, 2017, 04:06 AM IST

  • मुंबई  शेअर बाजारातील कंपन्यांचा मार्केट कॅप125 लाख कोटींच्या वर
मुंबई- मुंबई शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप मंगळवारी पहिल्यांदाच १२५ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. बाजार बंद झाला त्या वेळी शेअर बाजारातील लिस्टेड ५,७१६ कंपन्यांचा मार्केट कॅप १२५,५३,५६१ कोटी रुपये झाला. एका दिवसापूर्वीच हा १२४,४१,८९५ कोटी रुपये होता. म्हणजेच मार्केट कॅपमध्ये एकाच दिवसात १,११,६६६ कोटी रुपयांची वाढ झाली अाहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी मुंबई शेअर बाजारातील मार्केट कॅप १०६,२३,३४७ कोटी रुपये होता. त्या नंतर आतापर्यंत यात १८.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरम्यान सेन्सेक्समध्ये ३,३१७ अंकाची म्हणजेच १२.४५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
जगातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या न्यूयॉर्क शेअर बाजाराचा मार्केट कॅप सुमारे १,१०० लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच मुंबई शेअर बाजारापेक्षा नऊ पट मोठा. या शेअर बाजारातील निर्देशांकात जानेवारीपासून आतापर्यंत ७.१३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात
आली आहे.
निफ्टी ९३०० च्या वर
निफ्टीने मंगळवारी पहिल्यादा ९,३०० अंकांचा आकडा पार केला. निफ्टी ८८.६५ अंक किंवा ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह ९,३०६.६० या पातळीवर बंद झाला. या आधीचा विक्रम याच वर्षी पाच एप्रिल रोजीचा असून त्या वेळी निर्देशांक ९,२६५.१५ या पातळीवर बंद झाला होता. सेन्सेक्सदेखील ३०,००० च्या जवळ आहे. सेन्सेक्स २८७.४० अंक म्हणजेच ०.९७ टक्क्यांच्या वाढीसह २९,९४३.२४ या पातळीवर बंद झाला. पाच एप्रिलनंतरची ही सर्वात उच्चांकी पातळी आहे. सेन्सेक्स चार मार्च २०१५ रोजी विक्रमी ३०,०२४.७४ या पातळीवर बंद झाला होता.

Next Article

Recommended