आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Out Of Greece Crises, Sensex Crossed 28 Thousand

ग्रीसमधील संकटाच्या सावटातून बाजार बाहेर, सेन्सेक्स २८ हजारांच्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युराेझाेनमधून बाहेर पडण्यासाठी घालण्यात अालेल्या अटी मान्य करण्यास ग्रीसने नकार दिल्यामुळे प्रारंभीच्या सत्रात त्याचे पडसाद उमटून बाजार गडगडला, परंतु नंतर खरेदीचा जाेर वाढल्यामुळे ग्रीसच्या संकटाची भीती दूर झाली. दुपारी उशिरा झालेल्या खरेदीत बाजारात सुधारणा हाेऊन सेन्सेक्समध्ये ११५.९७ अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्स २८ हजारांची, तर निफ्टीनेदेखील ८०० अंकांची महत्त्वाची पातळी गाठली. ग्रीसमधल्या मतदारांनी बेलअाऊट पॅकेज धुडकावून लावल्याचा बाजारावर परिणाम हाेऊन तुफान विक्रीचा मारा झाल्यामुळे दाेन्ही निर्देशांक घसरले हाेते; परंतु रुपयाला मिळालेल्या बळकटीमुळे पुन्हा खरेदीचा जाेर वाढला, असे हेम सिक्युिरटीजचे संचालक गाैरव जैन यांनी सांगितले.

सेन्सेक्स २७,८५७.२ अंकांच्या पातळीवर उघडला, परंतु दिवसअखेर पुन्हा २८ हजार अंकांच्या वर म्हणजे २८,२०८.७६ अंकांच्या पातळीवर गेला अाणि ११५.९७ अंकांच्या वाढीची
नाेंद केली. निफ्टीमध्येदेखील ३७.२५ अंकांची वाढ झाली.

दुपारनंतर झालेल्या व्यवहारात काही बड्या समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे बाजारात सुधारणा झाली. ग्रीसच्या चिंतेपेक्षाही धाेरणकर्त्यांकडून मिळालेले सकारात्मक संदेश, अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी खर्चाचे प्रमाण लक्षणीय वाढवण्याचा घेतलेला सरकारी निर्णय हा सकारात्मक घडामाेडींचा बाजारावर चांगला परिणाम झाला. व्याजदर कपातीची शक्यता, चालू अार्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कंपन्यांची चांगली अाकडेवारी यामुळे जागतिक पातळीवर जाेखमीचे वातावरण असतानाही शेअर बाजारात गेल्या काही अाठवड्यांपासून लक्षणीय कामगिरी हाेत असल्याचे मत जिअाेजित बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशाेधनप्रमुख विनाेद नायर यांनी व्यक्त केले.

जर्मनी, फ्रान्ससमोर संकट
ग्रीसला संकटात मदत करण्यात जर्मनीची महत्त्वाची भूमिका आहे. युरोझोनच्या देशांमध्ये जर्मनी सर्वात मोठा कर्ज देणारा देश आहे. जर्मनीने आतापर्यंत ५७.२३ अब्ज युरो दिले आहेत. तर फ्रान्सने ४२.९८ अब्ज युरोचे कर्ज दिले आहे. ग्रीसमधील मतदानानंतर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी चर्चा करून ग्रीक नागरिकांच्या मताचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर युरोझोनमधील अर्थमंत्र्यांचे प्रमुख जेरोन डिजस्सेबलॉम यांनी जनमताचा निकाल निराशाजनक असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी ग्रीसमधील आर्थिक संकटाचा परिणाम जर्मनी आणि फ्रान्सवर होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

टाॅप गेनर्स : डाॅ. रेड्डीज लॅब, सिप्ला, हीराे माेटाेकाॅर्प, टीसीएस, लुपिन
टाॅप लुझर्स : वेदांत, हिंदाल्काे, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फाेसिस