आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मॅट'वर खुलासा, शेअर बाजाराला दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मासिक विक्री कामगिरी चांगली झाल्याने वाहन समभागांना अालेली मागणी अाणि त्यातच किमान पर्यायी कराबाबत सरकारकडून मिळालेली स्पष्टता यामुळे बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याच उत्साहात बाजारात झालेल्या तुफान खरेदीत सेन्सेक्सने २७,४९०.५९ अंकांची उसळी घेतली अाणि चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून पुन्हा २७,४९०.५९ अंकांची कमाल पातळी गाठली.

मे महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांना झालेली सुरुवात, तेल समभागांना अालेली मागणी अाणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वित्तविधेयक २०१५ संसदेत मंजूर झाल्यामुळे बाजारात सरसकट खरेदी झाली. त्यामुळे जवळपास महिनाभरानंतर सेन्सेक्सला चढती शिडी गाठता अाली. मॅट कराबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेली संदिग्धता दूर झाली अाणि बाजारात खरेदीचा उत्साह वाढला. गेल्या काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा झाला हाेता. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारात मूल्यधिष्ठित समभाग खरेदीवर गुंतवणूकदारांनी भर दिल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक भक्कम पातळीवर उघडला अाणि त्याने दिवसभरात २७,५३७.८५ अंकांची कमाल पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स ४७९.२८ अंकांनी वाढून २७,४९०.५९ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. या अगाेदर सेन्सेक्सने ५१७.२२ अंकांची उसळी ३० मार्च राेजी घेतली हाेती. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांकदेखील ८३०० अंकांची पातळी अाेलांडून ८३४६.०० अंकांच्या
कमाल पातळीवर गेला. िदवसअखेर िनफ्टी १५०.४५ अंकांनी वाढून ८३३१.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजार पुन्हा १०० लाख कोटींचा धनी
मॅटच्या खुलाशानंतर आलेल्या जोरदार तेजीमुळे शेअर बाजाराचे बाजारमूल्य पुन्हा १०० लाख कोटींवर पोहोचले आहे. सोमवारच्या तेजीने मुंबई शेअर बाजाराचे बाजारमूल्य आता १,०१,६८,५४२ कोटी झाले आहे. गुंतवणूकदारांची संपत्ती म्हणून गणण्यात येणारे हे मूल्य आठवड्यापूर्वी १०० लाख कोटींच्या खाली घसरले होते. सोमवारी सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २७ समभाग वधारले. कंपन्यांच्या नोंदणीत मुंबई बाजार हा जगातील अव्वल
१० बाजारांत गणला जातो.

अर्थमंत्र्यांनी दूर केली मॅटची संदिग्धता
राेखे विक्रीतून िमळणारी सर्व भांडवली िमळकत तसेच राॅयल्टी, व्याज, विदेशी कंपन्यांना िमळणारे तांत्रिक सेवा शुल्क अादी सर्व िकमान पर्याय कर अर्थात मॅटमधून वगळण्यात येतील. अशा उत्पन्नावरील सर्वसाधारण कराचा दर जर १८.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ही सवलत िमळेल, असे गेल्या अाठवड्यात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले हाेते.

तेजीचे मानकरी
ओएनजीसी, बजाज ऑटो, सिप्ला, महिंद्रा अँड महिंद्रा, भेल, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी, एसबीआय, डॉ. रेड्डीज,
इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प .

मिड कॅपवर उड्या
गुंतवणूकदारांनी बाजारातून स्मॉल व मिड कॅप समभागांची भरभरून खरेदी केली. त्यामुळे स्मॉल कॅप निर्देशांक २.०६ टक्क्यांनी तर मिड कॅप १.२८
टक्क्यांनी वधारला. किरकोळ गुंतवणूकदारांनी यंदा शेअर बाजारातून छोट्या व मध्यम कंपन्यांच्या समभागाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे.