आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाणेनिधी धाेरणाच्या अगाेदर बाजारात तेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाणेनिधी धाेरण अाढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार असल्याचा अंदाज बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केला अाहे. त्यामुळे बाजारात उत्साहाने झालेल्या खरेदीत ग्राहकाेपयाेगी वस्तू समभागांना मागणी येऊन सेन्सेक्सने चढती कमान कायम ठेवली. परंतु सन फार्माच्या समभाग किमतीत झालेल्या घसरणीमुळे या कमाईला मर्यादा अाल्या. त्यानंतर बाजारात चढ- उताराचे वातावरण कायम राहिल्याने सेन्सेक्सला दिवसअखेर २०.५५ अंकांच्या वाढीची मजल गाठता अाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ८४६७.१५ अंकांच्या कमाल पातळीवर गेला हाेता. परंतु सन फार्माच्या खराब अार्थिक कामगिरीनंतर निफ्टीने ८४०५.४० अंकांची नीचांकी पातळी गाठली होती.