आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांनी आठ महिन्यांमध्ये कमावले १०.७० लाख कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चालू वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठ्या प्रमाणात नफा देणारे ठरले आहे. चालू वर्षाचा विचार करता आतार्यंत म्हणजेच पहिल्या आठ महिन्यांत गुंतवणूकदारांनी १०.७० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा नफा मिळवला आहे. म्हणजे दरमहा सरासरी १.३४ लाख कोटी रुपये आणि दररोज सरासरी ४,४६० कोटी रुपये. इतकेच नाही, तर आठ महिन्यांत बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅपदेखील सुमारे ११ टक्के वाढला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजारात या वर्षी पुन्हा तेजी दिसून आली.

गुंतवणूकदारांना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला परतावा मिळाला. २०१५ मध्ये सेन्सेक्स टक्के घसरला होता, तर या वर्षी त्याने सुमारे दुपटीने वाढ मिळवली आहे. सप्टेंबरला ५२ आठवड्यांतील विक्रमी २८५८१.५८ पर्यंत पोहोचला होता.

टॉप-५ कंपन्यांचा मार्केट कॅप १५.६९ लाख कोटी रुपये आहे. या बाबतीत टाटा समूहाची टीसीएस मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्याही पुढे आहे. टीसीएसचा मार्केट कॅप रिलायन्सपेक्षा सुमारे १.६७ लाख कोटी रुपये जास्त आहे. एवढेच नाही, तर हे अंतर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या इन्फोसिसच्या मार्केट कॅपपेक्षाही ६४ हजार कोटी रुपये जास्त आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबरपर्यंत शेअर बाजारामध्ये लिस्टेड एकूण कंपन्यांचा मार्केट कॅप १० टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...