आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीकमधील आर्थिक मंदीचा \'साईड इफेक्ट\', पहिल्या दिवशीच कोसळला शेअर बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रीकमध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार कोसळला आहे. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स 535 अंशांनी घसरुन 27,451.07 अंशांवर तर निफ्टी 166 अंशांनी घसरुन 8,214 अंशांवर स्थिरावला आहे.

ग्रीकमध्ये सर्व बँका बंद
ग्रीकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आर्थिक मंदी आहे. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान अलिक्सिस त्सिप्रास यांनी सोमवारपासून सर्व बँका आणि शेअर बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एटीएममधून पैसे काढण्यावरही निर्बंध लादले आहेत.

बँकांचे कामकाज किमान आठवडाभर बंद राहू शकते, असे ग्रीक सरकारने जाहीर केले आहे. याकाळात खातेदार आपल्या खात्यातून एका दिवसाला फक्त 65 युरो ( 4200 रुपये) इतकी रक्कमच काढू शकतील. इतकेच नाही सरकारच्या परवानगीशिवाय खातेदार आपला पैसा देशाबाहेरही पाठवू शकणार नाहीत.
ग्रीकवर दीड अब्ज युरोचे कर्ज
ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज आहे. त्यात युरोपीय सेंट्रल बँकेने ग्रीकमधील बँकांना आणखी आपत्कालीन सहायता निधी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

ऑस्ट्रेलियन डॉलरची पत घसरली
ऑस्ट्रेलियामध्ये सोमवारी बाजार सुरु होतात पहिल्या दोन तासांत मोठी घसरण दिसून आली. मागील तीन वर्षीत इतकी घसरण पाहिली नसल्याचे ऑस्ट्रेलियातील विषेशज्ज्ञांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर ऑस्ट्रेलियन डॉलरची किंमत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमी झाली आहे.
ग्रीसमधील आर्थिक मंदीचा जपानमधील बाजारावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कोरिया आणि न्युझीलंडमधील बाजारावर एक-दोन टक्के परिणाम झाल्याची माहिती मिळाली.