आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 लाख नव्या नोकऱ्या मिळतील टेलिकॉममधे, स्मार्टफोनची मागणीतही वाढ झाली आहे.

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरी क्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रांत स्मार्टफोन उपयोग करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० च्या अखेरपर्यंत भारत जगातील चौथा सर्वात मोठी स्मार्टफोन बाजार असणारा देश होईल. अशात या क्षेत्रात रोजगार वाढण्याची शक्यता अधिक आहेत. यासाठी मोबाइल उत्पादन क्षेत्र युवकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकते. 
 
गेल्या महिन्यात सादर झालेल्या एका अहवालानुसार इंटरनेट डेटा असलेली वाढती मागणी आणि नवे सेवा पुरवठादारांची संख्या वाढल्याने देशाच्या टेलिकॉम उद्योगात रोजगाराच्या संधी वाढतील. २०१७ च्या शेवटापर्यंत या क्षेत्रात जवळपास २० लाख नव्या लोकांना रोजगार मिळेल.
 
यात जवळपास १७ लाख नोकऱ्या मोबाइल हँडसेट बनविण्याऱ्या कंपन्या वा याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये मिळतील, तथापि सेवा पुरवठादार कंपन्यातही जवळपास ३.५ लाख लोकांना रोजगार मिळेल. 
 
तथापी गेल्या ६ वर्षांत देशही मोबाइल इंटरनेटच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीमुळे मोबाइल ग्राहकांच्या संख्येत वाढ पाहावयास मिळाली आहे. एका अहवालानुसार २०१४ ते २०१७ च्या दरम्यान मोबाइल सेवा बाजाराचे उत्पन्न वार्षिक ५.२ टक्के या दराने वाढेल. मोबाइल उत्पादनाचा बाजारही देशात वेगाने वाढतो आहे.
 
 २०१९ च्या शेवटापर्यंत देशात जवळपास १८ कोटी स्मार्टफोन असतील, जे जगातील एकूण स्मार्टफोनच्या जवळपास १३.५ टक्के आहेत. २०२० पर्यंत जगभरातील प्रत्येक तीन फोनमधून २ स्मार्टफोन बाजारात असतील. स्मार्टफोन आणि मोबाइल ग्राहकांच्या वाढत्या संख्येत टेलिकॉम उद्योगात रोजगाराच्या नव्या संधी वाढत आहेत. 
 
या क्षेत्रात विभिन्न कौशल्य असणाऱ्या व्यावसायिकांसाठी जॉबच्या संधी आहेत, ज्यात इंटरनेट ऑफ थिंग्स, मोबिलिटी सोल्युशन्स, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, नेटवर्क आर्किटेक्चर, सेल्स, अॅप्लिकेशन्स डेव्हलपर आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही नोकऱ्यांच्या संधी आहेत.
 
अशात संगणक विज्ञान, संगणक अॅप्लिकेशन्स आणि व्यवस्थापन क्षेत्रातील युवकांसाठी यात करिअरचे उत्तम पर्याय आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग वा याच्याशी संबंधित क्षेत्राच्या व्यावसायिकांची ही या क्षेत्रात मागणी राहील. 
 
विज्ञान  व्यवस्थापनवाल्यांसाठी
विज्ञान शाखेत १२ वी करणारे विद्यार्थी संगणक विज्ञान, संगणक अॅप्लिकेशन्स, सायबर सुरक्षा, टेलिकॉम पायाभूत सुविधा, वा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगशी संबंधित बॅचलर कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. बारावीत गणित विषय गरजेचा आहे.
 
इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी जेईई मेनच्या माध्यामातून बॅचलर पदवी कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. तेच इतर शाखेतील पदवीधर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी विद्यार्थी विविध संस्थांद्वारे आयोजित होणाऱ्या प्रवेश चाचणीत भाग घेऊ शकतात.
 
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी यातील पदविका अभ्यासक्रमालाही प्रवेश घेता येतो. सेल्स वा मार्केटिंगमधून एमबीए करणारे विद्यार्थीही या क्षेत्रात करिअर बनवू शकतात. 
 
 खासगी क्षेत्रातही अधिक संधी 
या क्षेत्रात व्यावसायिकांसाठी मोबाइल उत्पादन युनिट, टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांत नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रातील अधिकांश नोकऱ्या खासगी क्षेत्रातच उपलब्ध आहेत. सरकारच्यानुसार गेल्या वर्षापासून ३७ नवीन मोबाइल उत्पादन प्लांट सुरू झाले आहेत. अशात या क्षेत्रात नोकरीच्या शक्यताही अधिक आहेत. 
 
२ ते ३ लाख रुपये प्रारंभिक पॅकेज 
या क्षेत्रात फ्रेशरला सरासरी २ ते ३ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळताे आहे. मोबाइल उत्पादनाच्या क्षेत्रात फ्रेशरला १८ ते २५ हजार रुपये प्रतिमाह पॅकेज मिळण्याची शक्यता असते. अनुभवानंतर वार्षिक पॅकेज ४ ते ६ लाख रुपयांपर्यंत होण्याची शक्यता असते.
 
बातम्या आणखी आहेत...