भारतीय सुवर्ण बाजारात / भारतीय सुवर्ण बाजारात सोने, चांदीतील भाववाढीला ‘ब्रेक’

वृत्तसंस्था

Feb 21,2017 03:11:00 AM IST
नवी दिल्ली- भारतीय सुवर्ण बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोने भावात होत असलेल्या वाढीला सोमवारी “ब्रेक’ लागला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी झालेल्या व्यवहारात सोने १८० रुपयांच्या घसरणीसह २९७०० रुपये प्रतिदहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले.
जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत अणि भारतीय बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोमवारी मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच चांदीच्या दरात ही घसरण नोंदवण्यात आली.
दिल्ली सराफा बाजारात चांदी ३०० रुपयांच्या घसरणीसह ४३१५० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्री झाली. भारतीय बाजारावर परिणाम करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ०.०२ टक्के तर चांदीच्या दरात ०.०६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोने तसेच चांदीच्या मागागीत घट नोंदवण्यात अाल्यामुळेच दरात घट नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
X
COMMENT