आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा २८ हजारांवर, जागतिक बाजारातील तेजीसह चांगल्या धारणेचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारात आलेली तेजी यासह विविध सकारात्मक धारणा निर्माण झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ५२१ अंकांच्या वाढीसह २८,०५१ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १५८ अंकांनी वाढून ८६७८ च्या पातळीवर बंद झाला. जागतिक बाजारातील तेजीमुळे तसेच रुपयात आलेल्या मजबुतीमुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी नोंदवण्यात आली. बँकिंग, मीडिया, मेटल आणि रिअॅल्टी क्षेत्रात सर्वात जास्त तेजी दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान मुंबई शेअर बाजारातील मार्केट कॅप १.६२ लाख कोटी रुपयांनी वाढला.

एस्सार करारानंतर बँकिंग स्टॉक्समध्ये चांगली तेजी नोंदवण्यात आली. बँक निफ्टी ४२५ अंकांनी वाढून बंद झाला. बँकिंग स्टॉक्सची सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत मोठी भागीदारी आहे. एस्सारचा सर्वात जास्त एक्सपोझर आयसीआयसीआय बँकेमध्ये आहे. आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉक्समध्ये ४.०६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, तर एस बँक ३.३१ टक्के, पीएनबी ३.२९ टक्के आणि कॅनरा बँकेचे स्टॉक्स ३.१२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

मिडकॅप निर्देशांकात वाढ
बीएसईवर मिडकॅप इंडेक्स १.८९ टक्क्यांनी वाढून बंद झाला. मिडकॅप इंडेक्समध्ये सर्वात जास्त तेजी एलआयसी हाउसिंग फायनान्स - ६.३० टक्के, बजाज फिनसर्व्ह - ५.१९ टक्के, डिव्हीज लॅब ४.८० टक्के, एक्साइड इंडस्ट्रीज ४.६७ टक्के, पेज इंडस्ट्रीज ४.४८ टक्के आणि युनियन बँक - ४ टक्क्यांची वाढ दिसून आली.

बाजारातील तेजीचे कारण
विविध बाजूंनी आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये आशियाई बाजार आणि युरोपीय बाजारात तेजी, कच्च्या तेलात तेजी तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या संकेतांमुळे जागतिक बाजारातील तेजी यांचा समावेश आहे. तसेच एस्सार करारानंतर बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. याव्यतिरिक्त नीचांकी पातळीवरदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी नोंदवण्यात आल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांकांत वाढ झाली.

स्मॉलकॅप निर्देशांकात १.३० टक्क्यांची तेजी
स्मॉलकॅप इंडेक्स १.३० टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सर्वात जास्त वाढ झालेल्या स्टॉक्समध्ये इंडियन ह्यूम २० टक्के, झुआरी अॅग्रो केमिकल २० टक्के, ओम मेटल्स ९.५० टक्के, मासटेक ११.५५ टक्के, एचसीसी ९.९४ टक्के आणि जेएसएल १० टक्के यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय बाजार हिरव्या निशाणीवर बंद
राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांतील निर्देशांक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होते. यामध्ये सर्वात जास्त वाढ मीडिया, मेटल, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, बँक निफ्टी, एफएमसीजी या क्षेत्रात नोंदवण्यात आली अाहे.
बातम्या आणखी आहेत...