आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांची श्रीमंती घटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भांडवल बाजारात अलीकडे झालेल्या विक्रीच्या माऱ्याचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. विक्रीच्या तडाख्यात मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरून ९५.४० लाख कोटी रुपयांवर आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात गुंतवणूकदारांची श्रीमंती जवळपास तीन लाख कोटी रुपयांनी घटली आहे.

भांडवल बाजारातल्या सर्व नोंदणीकृत कंपन्यांची संकलित बाजारमूल्यामध्ये मोजली जाणारी गुंतवणूकदारांची एकूण संपत्ती २.९५ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ती यंदाच्या वर्षात ९५.४० लाख कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या वर्षात भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांनी २८ लाख कोटी रुपयांची भर घातल्यामुळे सर्व नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य ९८.३६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले होते. केवळ इतकेच नाही, तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीनेदेखील गेल्या वर्षात १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

यंदाच्या वर्षात सेन्सेक्स १,६३५.९२ अंकांनी घसरून २५,८६३.५० अंकांच्या पातळीवर आला आहे. या वर्षात चार मार्चला सेन्सेक्सने ३०,०२४.७४ अंकांची सगळ्यात कमाल पातळी गाठली हाेती. २४ ऑगस्टला सेन्सेक्सने १६२४,५१ अंकांची एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण नोदवली. चीनच्या आर्थिक चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना या दिवशी जवळपास सात लाख कोटी रुपयांचा फटका बसला.