आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरलचा धसका, शेअर बाजारात तेजीला बुक्का, सेन्सेक्स ३८२ अंकांनी कोसळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डिसेंबरमध्ये अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढीची शक्यता, सप्टेंबर तिमाहीत कंपन्यांची अपेक्षाभंग करणारी कामगिरी याचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी शेअर बाजारात विक्रीचा धडाका लावला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ३८१.९५ अंकांनी कोसळून २५,४८२.५२ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०५.७५ अंकांनी गडगडून ७७३१.८० वर स्थिरावला. नफावसुलीमुळेही बाजारातील तेजीला बुक्का बसला. सेन्सेक्सने दोन महिन्यांची नीचांकी पातळी गाठली.

दलालांनी सांगितले, सप्टेंबर तिमाहीत अनेक दिग्गज कंपन्यांनी अपेक्षाभंग करणारी कामगिरी नोंदवली. त्यातच अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. डिसेंबरमध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे नफा पदरात पाडून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सकाळपासूनच सुरू केला. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टीत मोठी घसरण झाली. बाजारातील ब्ल्यू-चिप कंपन्यांना विक्रीचा मोठा फटका बसला. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाल्याने समभाग विक्री वाढली. दिग्गज कंपन्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा फटका बसला. आशिया तसेच युराेपातील प्रमुख बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २६ समभाग घसरले.

निफ्टी गडगडून ७८०० च्या खाली
सोने घसरले
सोने रु. ७५ घसरून
रु. २५,६२५ तोळा

चांदी रु. ०० घसरून
रु. ३४,१०० किलो
पुढील स्लाइड्सवर पाहा, मार्केटमध्ये काय काय घडल्या घडामोडी...