आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत उत्तम परतावा देणारे अव्वल समभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे कोठे पैसे गुंतवावेत याबाबत संभ्रम आहे. बाजारातील या अस्थैर्यातही असे काही समभाग आहेत, ज्यांच्यावर बाजाराच्या चालीचा फारसा परिणाम होत नाही. या समभागांनी मागील पाच वर्षांत सातत्याने उत्तम परतावा दिला आहे. यात काही समभाग असे आहेत की, ज्यांनी पाच वर्षांत १००० ते ४००० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अजंता फार्मा, ला ओपाला, कीटॅक्स हारमेंट आणि सिंफनी ही याची काही उदाहरणे आहेत.
ग्लाेब कॅपिटलचे संशोधन विभागाचे सहायक उपाध्यक्ष उमेश शर्मा यांच्या मते, या कंपन्यांचे फंडामेंटल अत्यंत मजबूत असल्याने या कंपन्यांत सातत्याने तेजी आहे. यात गुंतवणूक करता येईल. या समभागात दीर्घकाळासाठी गुंतवणूक फायदेशीर राहील.
समजा तुम्ही पाच वर्षांपूर्वी सन फार्मा, ल्युपिन, झी एंटरटेनमेंट यांच्या समभागात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य पाच लाख रुपयांहून जास्त दिसले असते. या समभागांनी २०११ ते २०१५ या काळात २५० टक्क्यांहून जास्त रिटर्न दिले आहेत. याच काळात शेअर बाजाराने २६ टक्के रिटर्न दिले. शेअर बाजारात जानेवारीत मोठी घसरण दिसून येत असली तरी वार्षिक आधारावर या समभागांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. गेल्या वर्षी २०१५ मध्ये अजंता फार्मा आणि ला ओपालासारख्या समभागांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. मात्र, वर्षअखेरीस या शेअर्सनी सकारात्मक परतावा दिला.