आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टी १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकाच दिवसात सुमारे लाख ४० हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. गुंतवणुकीची किंमत सध्याच्या शेअर बाजारातील किमतीच्या आधारावर निश्चित केली जाते. तांत्रिक भाषेत यालाच मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात.
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांकात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४० अंकांनी वाढून २८,३४३ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १३७ अंकांच्या वाढीसह ८,७४४ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स १३ महिन्यांच्या तर निफ्टी १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत तसेच भारतीय बाजारातील मजबूत अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक धारणा वाढली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून यामुळेच बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे.

रुपया महिनाभराच्या उच्चांकावर
जागतिक बाजारात मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये तेजी दिसून आली. रुपया १५ पैशांच्या वाढीसह ६७.०३ च्या पातळीवर बंद झाला. महिनाभरातील ही रुपयाची विक्रमी पातळी आहे. निर्यातदार तसेच बँकांच्या वतीने डॉलरची विक्री करण्यात आल्यामुळे रुपयामध्ये मजबुती दिसून आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत मिळाल्यामुळे अार्थिक पातळीवर गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावर विश्वास वाढला असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...