Home | Business | Share Market | news about share market

सेन्सेक्ससह निफ्टीतही किरकोळ वाढीची नोंद

वृत्तसंस्था | Update - Jan 04, 2017, 04:58 AM IST

वर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला,

  • news about share market
    नवी दिल्ली- वर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १३ अंकाच्या वाढीसह ८१९२ अंकाच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील २८ स्टॉक्समध्ये तेजी तर २३ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे.

    भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सर्वाधिक वाढ ऊर्जा क्षेत्रातील स्टॉक्समध्ये नोंदवण्यात आली असून या क्षेत्रातील निर्देशांक एक टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. तर सार्वजनिक क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे ०.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर एफएमसीजी क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे ०.८ टक्क्यांची वाढ दिसून आली. एफएमसीजी क्षेत्रातील निर्देशांकात समावेश असलेल्या इमामी सहा टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. वाढ मिळवणाऱ्या दुसऱ्या क्षेत्रात रिअल्टी क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे एक टक्क्याची
    वाढ झाली. ऑटो क्षेत्रातील निर्देशांकात ०.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

Trending