Home | Business | Share Market | news about share market

शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३३, तर निफ्टी ९ अंकांनी घसरला

दिव्य मराठी | Update - Jan 31, 2017, 01:20 AM IST

आशियाई बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे झालेल्या नफारूपी व्यवहारामुळे आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली.

  • news about share market
    मुंबई- आशियाई बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे झालेल्या नफारूपी व्यवहारामुळे आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३३ अंकांच्या घसरणीसह २७,८४९ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९ अंकांच्या घसरणीसह ८६३२ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

    सोमवारी झालेल्या व्यवहारात निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या ५१ शेअरमधील १८ शेअर वाढीसह, तर २३ शेअर घसरणीसह बंद झाले. मोठ्या आणि छोट्या कंपन्यांच्या शेअरमध्ये नफारूपी विक्री दिसून आली तर मध्यम कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदी नोंदवण्यात आली. बीएसईतील मिडकॅप ०.२८ टक्क्यांच्या तेजीसह १३,००१ अंक तर स्मॉलकॅप ०.३२ टक्क्यांनी घसरून १३,०७० अंकांच्या पातळीवर बंद झाला. फार्मा, कंझम्प्शन, ऊर्जा, इन्फ्रा अणि सेवा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रांत घसरण झाली.

  • news about share market

Trending