Home | Business | Share Market | news about share market

अर्थसंकल्पाआधी बाजारात घसरण, आयटी क्षेत्रावर दबाव, सेन्सेक्स १९४, तर निफ्टी ७१ अंकांनी खाली

वृत्तसंस्था | Update - Feb 01, 2017, 03:02 AM IST

जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि अमेरिकेच्या संसदेत एच-वन-बी बिल सादर झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला. त्यामुळे मंगळवारी झालेल्या व्यवहारात भारतीय बाजारात जोरदार घसरण नोंदवण्यात आली.

 • news about share market
  मुंबई- जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि अमेरिकेच्या संसदेत एच-वन-बी बिल सादर झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला. त्यामुळे मंगळवारी झालेल्या व्यवहारात भारतीय बाजारात जोरदार घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १९४ अंकांच्या घसरणीसह २७,६५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह ८५६१ च्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान निफ्टी ८५५२ अंकापर्यंत खाली गेला होता. तर सेन्सेक्सदेखील २७,६२४ अंकांपर्यंत घसरला होता.

  अमेरिकेतील संसदेत एच-वन-बी बिल सादर झाल्याच्या वृत्तामुळे भारतीय बाजारातील अायटी कंपन्यांच्या शेअरवर दबाव दिसून आला. मंगळवारी झालेल्या व्यवहारात एनएसईवर आयटी निर्देशांक ३.१७ टक्क्यांच्या घसरणीसह ९८४८ च्या पातळीवर बंद झाला. निर्देशांकात समावेश असलेल्या सर्व १० शेअर घसरणीसह बंद झाले. सर्वच शेअरमध्ये दोन टक्क्यांपेक्षा जास्तीची घसरण नोंदवण्यात आली. टीसीएसच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४.३३ टक्क्यांची घसरण झाली. या व्यतिरिक्त एचसीएल टेकमध्ये ४.२३ टक्के, टेक महिंद्रामध्ये ३.९५ टक्के, विप्रोमध्ये १.१५ टक्के आणि इन्फोसिसमध्ये २.१० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

  आयटी व्यतिरिक्त फार्मा, मेटल, ऑटो, ऑइल अँड गॅस तसेच पॉवर क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. निफ्टीमधील फार्मा निर्देशांकात १.६९ टक्के, मेटल निर्देशांकात १.०५ टक्के घसरण झाली.

  घसरणीची कारणे
  - अमेरिकी संसदेत एच-वन-बी बिल सादर झाले.
  - ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणामुळे धारणा नकारात्मक झाली.
  - आशियाई बाजारावर ट्रम्प परिणाम दिसून आला.
  - युरोपीय बाजारावर ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजारात १% घसरण.
  - जागतिक नकारात्मक संकेताचा परिणाम झाला.

Trending