आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक संकेत- ऑटो, बँकिंग क्षेत्रामुळे बाजार दीड वर्षाच्या उच्चांकावर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार वर्षभरातील विक्रमी पातळीवर बंद झाले. दुपारनंतर झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील ३० अंकांचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०९ अंकांच्या वाढीसह २८,५३२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह ८८०९ च्या पातळीवर बंद झाला.
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी ऑटो तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक्समध्ये सर्वाधिक खरेदी नोंदवण्यात आली आहे.

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सर्वाधिक वाढ ऑटो क्षेत्रात नोंदवण्यात आली आहे. या क्षेत्रातील निर्देशांक १.४४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. जवळपास सर्वच ऑटो कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवण्यात आली आहे. तसेच चांगला पाऊस आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळेदेखील सणासुदीत ऑटो क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ दिसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्याचाही परिणाम या क्षेत्रातील गुंतवणूकदारांवर झाला. रबरच्या किमती कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम टायर कंपन्यांच्या नफ्यावर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे टायर कंपन्यांच्या स्टॉक्समध्येदेखील तेजी दिसून आली. यात अपोलो टायर्स चार टक्के, एमआरएफ चार टक्के, अमरा राजा बॅटरीजमध्ये २.६३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्टाॅक्समध्ये झालेल्या खरेदीमुळेदेखील बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. निर्देशांकात १.३७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बँक ऑफ बडोदा तीन टक्के, अलाहाबाद बँक २.६८ टक्के, बँक ऑफ इंडिया २.४५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
तेजीची कारणे
- विदेशी बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत
- युरोपियन बाजारात तेजी नोंदवण्यात आली
- ऑटो क्षेत्रातील विक्रीमध्ये नोंदवण्यात आलेली वाढ
- भारतीय अर्थव्यवस्थेबाबत फिचने व्यक्त केलेले सकारात्मक मत
- चांगल्या मान्सूनचा परिणाम
- सातव्या वेतन आयोगाचा पैसा बाजारात दाखल
- उत्पादन पीएमआयमध्ये वाढ
बातम्या आणखी आहेत...