आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात पुन्हा घसरण, सेन्सेक्समध्ये ७५ तर िनफ्टीमध्ये १५ अंकाची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ७५ अंकाच्या घसरणीसह २७१२६ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १५ अंकाच्या घसरणीसह ८३२३ च्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सर्वात जास्त घसरण इन्फ्रा क्षेत्रात नोंदवण्यात आली आहे.

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी इन्फ्रा क्षेत्रात एक टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या िनर्देशांकात ०.९४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. युनियन बँक, सिंडीकेट बँक, बँक ऑफ बडाेदा, कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक दोन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. पॉवर क्षेत्रातील निर्देशांकात ०.७ टक्क्यांची घसरण दिसून आली. दूरसंचार क्षेत्रातील स्टॉक्समध्ये चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

मिडकॅप शेअरमध्ये खरेदी
भारतीय बाजारात शुक्रवारी मिडकॅप शेअरमध्ये खरेदी नोंदवण्यात आली आहे. बीएसई मिडकॅप स्टॉक्समध्ये ०.१ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली. प्रमुख निर्देशांकात समावेश असलेल्या केडिला हेल्थकेअर सुमारे पाच टक्क्यांनी वाढला. बर्जर पेन्टस आणि एबीबीमध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ दिसून आली. तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात ०.१७ टक्क्यांची घसरण दिसून आली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...