आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १४५ अंकांच्या वाढीसह २७,१४४ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह ८,३२८ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने गेल्या अाठ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाढली आहे. एफएमसीजी, इन्फ्रा आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली.

भारतीय शेअर बाजारात आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे मुंंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशाक सेन्सेक्स आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर बंद झाला. याआधी २६ ऑक्टोबर २०१५ रोजी सेन्सेक्स या पातळीवर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १० महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. २० ऑगस्ट २०१५ नंतर पहिल्यादांच निफ्टी ८३०० च्या पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला आहे.

भारतीय बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सर्वात जास्त खरेदी मिडकॅप स्टॉक्समध्ये दिसून आली. शुक्रवारी मिडकॅप निर्देशांकात १.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मिडकॅप निर्देशांकात समावेश असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा फा. सर्व्हिसेसमध्ये सात टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ नोंदवण्यात आली. तर जिंदल स्टीलमध्ये पाच टक्क्यांची वाढ दिसून आली.

एफएमसीजी क्षेत्रात सर्वात जास्त वाढ दिसून आली. या निर्देशांकात दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रातील निफ्टीदेखील १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवभर बाजारात झालेल्या व्यवहारानंतर बँक ऑफ इंडिया तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...