Home | Business | Share Market | news about stock market

शेअर बाजार वधारला

वृत्तसंस्था | Update - Jan 12, 2017, 03:10 AM IST

आठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला,

  • news about stock market
    मुंबई - आठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या वाढीसह ८३८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मेटल तसेच बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये समावेश असलेले ४१ स्टाॅक्स वाढीसह बंद झाले. व्यवहारात सर्वात जास्त तेजी मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये नोंदवण्यात आली आहे. निफ्टीमधील मेटल निर्देशांकात ४.४३ टक्क्यांची वाढ दिसून अाली. व्यवहारादरम्यान बँकिंग शेअरमध्येदेखील खरेदी दिसून आली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्टॉक्समध्ये खरेदी नोंदवण्यात आली. निफ्टीमधील बँक निर्देशांक २.२८ टक्क्यांच्या वाढीसह १८,८३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Trending