Home | Business | Share Market | Nifty breaches 10,000 mark, Sensex at new high

60 हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे निफ्टी गेला 10,000 च्या वर; गुंतवणूकदारांचा जल्लोष

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 26, 2017, 01:11 AM IST

निफ्टीने मंगळवारी मार्केट उघडताच तब्बल 10,000 अंकांचा ऐतिहासिक पल्ला गाठला आहे.

 • Nifty breaches 10,000 mark, Sensex at new high
  सहा वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांचा नफा सुद्धा यावेळी दुप्पट झाला आहे.
  मुंबई - मंगळवारी शेअर बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १०,०११ पर्यंत पोहोचला. २२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निफ्टीने १०,००० ची पातळी पार केली. मात्र, नंतर झालेल्या नफारूपी विक्रीमुळे निफ्टी ९,९६४ या पातळीवर बंद झाला. निर्देशांक ३ मार्च २०१५ आणि पुन्हा १४ मार्च २०१७ रोजी ९,००० च्या पातळीवर गेला होता.
  या वर्षी मार्च महिन्यातील पातळी पाहिली तर निर्देशांक २५६ महिन्यांत ९,००० पर्यंत गेला होता. त्यानंतर केवळ साडेचार महिन्यांत ६०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा १०,००० पर्यंत पोहोचला आहे. मात्र, ही याची सर्वात तेजीने झालेली वाढ नाही. २००७ मध्ये ५,००० वरून ६,००० पर्यंत पोहोचण्यासाठी याला ३५ दिवस लागले होते. नोव्हेंबर १९९५ मध्ये १,००० वरून निर्देशांकाला सुरुवात झाली होती. त्या वेळी २,००० पर्यंत पोहोचण्यासाठी २,९८९ दिवस लागले होते.
  सेन्सेक्सलाही लागली २० वर्षे : मुंबई शेअर बाजरातील सेन्सेक्सलाही १०,००० पर्यंत पोहोचण्यासाठी २० वर्षे लागली होती. सेन्सेक्स जानेवारी १९८६ मध्ये १,००० या पातळीवर होता, येथून हा फेब्रुवारी २००६ मध्ये १०,००० पर्यंत पोहोचला होता.

  गुंतवणूक वाढली
  - मार्च ते जुलैदरम्यान भारतीय शेअर बाजारात ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. यात विदेशी गुंतवणूकदारांनी ३७,९५१ कोटी आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २२,३०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  - याआधी ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी ३९,९७९ कोटी रुपये काढून घेतले होते. त्या वेळी देशांतर्गत संस्थांनी ३९,८२३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
  - अलीकडच्या काही महिन्यांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली आहे. यात २०१६-१७ मध्ये विक्रमी ३.४३ लाख कोटी रुपये आले, जे २०१५- १६ च्या १.३३ लाख कोटी रुपयांपेक्षा १५५ टक्के जास्त आहेत.
  - फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांचे योगदान वाढले आहे. २०१२ मध्ये एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला सरासरी ९८० कोटी रुपये आले होते. एप्रिल २०१७ मध्ये हा आकडा ४,२६९ कोटी रुपये होता.

 • Nifty breaches 10,000 mark, Sensex at new high
  1996 मध्ये 1000 रुपयांची बेस व्हॅल्यू असलेले निफ्टी आज 10 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे.

Trending