आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nifty Slipped 17 Points To Close At The Level Of 7831

सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात सुस्ती, सेन्सेक्समध्ये ४३ अंकांची घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मर्यादेत व्यवहार दिसून आला. सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरून २५,७७५ वर बंद झाला, तर निफ्टी १७ अंकांनी घसरून ७८३१ वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने २५,९०१ अंकांची उच्चांकी पातळी, तर २५,७०३ अंकांनी नीचांकी पातळी गाठली होती. म्हणजेच दिवसभरात सेन्सेक्स १९८ अंकांच्या मर्यादेत राहिला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये ८२ अंकांची जास्तीत जास्त वाढ तर ११६ अंकांची जास्तीत जास्त घसरण दिसून आली.

बाजारात गेल्या काही दिवसांत मर्यादेत व्यवहार होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसे पाहिले तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बाजाराचे लक्ष सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर तसेच फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावर आहे. त्यानंतर बाजाराची दिशा निश्चित होणार आहे.
छोट्या शेअरमध्ये वाढ
सेन्सेक्सपासून वेगळ्या छोट्या शेअरमध्ये मंगळवारीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप इंडेक्स मंगळवारी ०.३३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये समावेश असलेल्या शेअरमध्ये सर्वात जास्त वाढ गॅमन इंडियाच्या शेअरमध्ये दिसून आली. या शेअरमध्ये १९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर इंडेक्समध्ये समावेश असलेल्या १५ कंपन्यांमध्ये मंगळवारी १० टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ दिसून आली. दुसरीकडे मिडकॅप इंडेक्समध्येही ०.०८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
युराेपीय बाजारातील मंदीचा दिसला परिणाम
गुुरुवारी नोव्हेंबर सिरीजची एक्स्पायरी आणि उद्या बाजार बंद राहणार असल्याने गुंतवणूकदारांनी मर्यादेतच व्यवहार करणे पसंत केले. व्यवहाराच्या दरम्यान व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात कमी राहिल्यामुळेही इंडेक्समध्ये कोणतीच मोठी हालचाल दिसून आली नाही. व्यवहाराचा शेवटचा एक तास पाहिला तर त्यावर युराेपीय बाजारातून आलेल्या कमजोरीचा परिणाम दिसून येतो. यामुळे मर्यादेतील वाढीची जागा घसरणीने घेतली.