आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Political Parties Agree On The Issue Of The GST

संसदेत जीएसटी मंजुरीच्या अपेक्षेमुळे बाजारात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक आणि देशांतर्गत बाजाराला मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वरच्या पातळीवर बंद झाले. जीएसटीच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती होण्याची शक्यता दिसून आल्याचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. युरोपात आणखी एक मदत पॅकेज मिळण्याची शक्यता आणि हिवाळी अधिवेशनात जीएसटीवर सर्वपक्षीय सहमती होण्याची आशा यामुळे बाजारात तेजी अाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ऑटो आणि रिअॅल्टीमध्ये वाढ
फार्मा आणि आयटी इंडेक्स सोडला तर बाकी सर्व क्षेत्रांतील इंडेक्स हिरव्या निशाणीवर बंद झाले. रिअॅल्टी क्षेत्रात २ टक्क्यांची वाढ झाली, तर मीडिया इंडेक्समध्ये १.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ऊर्जा क्षेत्रातील इंडेक्स १.५, मेटल इंडेक्स एक टक्क्याच्या वाढीसह बंद झाले. ऑटो इंडेक्सने सुमारे एक टक्क्याच्या वाढीसह व्यवहार केल्याचे दिसून आले.