आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील या शहरांमध्ये वाढणार प्रॉपर्टीचे रेट, या शहरांमध्ये होणार बायपास-रिंगरोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे ८० शहरांमध्ये रिंगरोड आणि बायपास बनविण्याची घोषणा केली आहे. यावर कागदपत्रांशी संबंधित काम सुरु झाले आहे. यामुळे शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार असून ट्रॅव्हल टाईम कमी होणार आहे. तसेच ट्राफिक जामपासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रॉपर्टीच्या किमती वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

काय सांगतात मार्केट एक्सपर्ट
जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर यांनी सांगितले, की ट्रान्सपोर्टचे सरकारने प्रोजेक्ट राबविले की संबंधित शहरांमधील प्रॉपर्टीचे रेट वाढतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. मुंबई ज्या भागांमध्ये मेट्रो कनेक्टीव्हीटी वाढली त्या भागांमध्ये सुमारे ४०० टक्क्यांनी प्रॉपर्टीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारत माला प्रोजेक्टलाही याचा फायदा होईल.

 

तुम्हाला होऊ शकतो फायदा
तुमची जर या शहरांमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला विकायची आहे तर काही दिवस धीर धरा. काही वर्षांत त्याची किंमत वाढलेली दिसून येईल. सध्या या शहरांमध्ये प्रॉपर्टीची किंमत स्थिर आहे. तुम्हाला इन्व्हेंटमेंट करायची असेल तर ही योग्य संधी आहे. काही वर्षांत तुमच्या गुंतवणुकीची योग्य रिटर्न तुम्हाला मिळू शकते. शिवाय इन्व्हेंट करताना ज्या भागातून हा बायपास जाणार आहे त्या परिसरात गुंतवणूक करा. सध्या तेथे जमिनीच्या किमती कमी असण्याची शक्यता आहे.

 

या शहरांमध्ये होणार आहे बायपास
सरकारने एकूण ५१ शहरांमध्ये बायपास तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लुधियाना, आग्रा, वाराणसी, औरंगाबाद, अमृतसर, ग्‍वाल्हेर, सोलापूर मध्ये 4 बायपास, नादेंडमध्ये दोन, जालंधर, फिरोजाबाद, सिलीगुडी, जळगाव, कोझिकोडी, कुरनॉल, बोकारो, बेल्लारी, धुळे, विलासपूर, देवासमध्ये दोन, जालना, सागर, मिर्जापूर, रायचूर, गंगा नगर, होसपत, ऑनगोल, मोर्वी, रायगंज, पनवेल, विदिशा, सासाराम, छत्‍तरपूर, बागलकोट, सिहोर, जहानाबाद, नागोर, चिलाकलुरपित, रिनीगुंटा, सांगरेड्डी, इंफाळ, सिलचर, शिलॉंग, डिब्रुगड, दीमापूर, उदयपूर, हिंगणघाट आणि चित्रदुर्गा यांचा समावेश आहे. या सर्व शहरांमधून वेगवेगळे हायवे जातात.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कुठे तयार केला जाईल रिंग रोड... ही आहेत शहरे...

बातम्या आणखी आहेत...